बॅडमिंटनपटू कृष्णा नागरने इतिहास रचला, भारतास 5 वे सुवर्णपदक

बॅडमिंटनपटू कृष्णा नागरने इतिहास रचला, भारतास 5 वे सुवर्णपदक
Krishna Nagar

टाेकियाे : येथे सुरु असलेल्या टाेकियाे पॅरालिंपिक स्पर्धेतील tokyo paralympics 2020 बॅडमिंटन क्रीडा प्रकारात आज भारताच्या बॅडमिंटनपटू कृष्णा नागरने Krishna Nagar सुवर्ण कामगिरी करीत देशाच्या पदकतालिकेत आणखी एक पदक समाविष्ट केले. त्यामुळे आता भारताच्या खात्यात एकूण १९ पदके झाली आहेत. india-krishna-nagar-wins-paralympics-gold-medal-in-badminton-men-singles-sh6-category-sml80

आज रविवारची सकाळ भारतीयांसाठी सुखद ठरली. पॅरालिंपिकमधील बॅडमिंटनच्या badminton पुरुष गटातील एकेरीच्या SH 6 गटातील अंतिम लढतीत भारताच्या नागरने हाँकाँगचा च्यु मॅन काय यास नमविले. पहिला सेट कृष्णाने २१-१७ असा जिंकला. त्यानंतरच्या सेटमध्ये च्यु मॅन काय याने कृष्णाला २१-१६ असे हरवित जबरदस्त कमबॅक केली. तिस-या सेटमध्ये कृष्णाने बहारदार खेळ करीत २१-१७ अशी मात करीत सुवर्ण कामगिरी केली. त्याचा विजय हाेताच भारतीय संघाच्या पाठीराख्यांनी जल्लाेष केला.

Krishna Nagar
काेकणवासीयांनाे! बाप्पाच्या उत्सवास गावी जाणार आहात? हे वाचा

टोकियो पॅरालिंपिकमध्ये भारताचे हे पाचवे सुवर्णपदक आहे. कृष्णासह प्रमोद भगत (बॅडमिंटन), मनीष नरवाल (नेमबाजी), सुमित अँटिल (भालाफेक) आणि अवनी लेखरा (नेमबाजी) यांनी देशास सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

दरम्यान पॅरालिंपिक स्पर्धेचा आज शेवटचा दिवस आहे. यंदाच्या या स्पर्धेत भारताने आत्ता पर्यंत एकूण १९ पदक पटकाविली आहेत. यामध्ये पाच सुवर्ण, आठ राैप्य आणि सहा कास्यपदकाचा समावेश आहे. भारतीय संघाच्या कामगिरीचे काैतुक समाज माध्यमातून हाेत असून प्रत्येकाला खेळाडूंचा अभिमान वाटत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com