IND vs BAN: बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला विश्रांती

टीम इंडिया डिसेंबर महिन्यात बांग्लादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाची घोषणा केली आहे
team india
team indiasaam tv

India Tour of Bangladesh 2022 Squad : टीम इंडिया डिसेंबर महिन्यात बांग्लादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दौऱ्यादरम्यान संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी ही रोहित शर्मावर देण्यात आली आहे. तर उप कर्णधारपदाची जबाबदारी ही केएल राहुलला दिली आहे. या संघातून मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला विश्रांती दिली आहे. (Latest Marathi News)

team india
Team India : टीम इंडियाच्या सामन्याचं ठिकाण अचानक बदललं, का घ्यावा लागला हा निर्णय?

डिसेंबर महिन्यात टीम इंडिया (Team India) बांग्लादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यादरम्यान भारताच्या बांग्लादेशाविरुद्ध ३ एकदिवसीय सामने आणि २ कसोटी सामने होणार आहेत. या दौऱ्यात कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्मावर असणार आहे. तर केएल राहुल उप कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. विराट कोहली देखील या दौऱ्यात खेळताना दिसणार आहे.

IND vs BAN 1st ODI: ४ डिसेंबर

IND vs BAN 2nd ODI: ७ डिसेंबर

IND vs BAN 3rd ODI: १० डिसेंबर

एकदिवसीय सामन्यानंतर भारत आणि बांग्लादेश संघामध्ये २ कसोटी सामने होणार आहेत. दोन्ही कसोटी सामने हे वेगनवेगळ्या स्टेडियममध्ये खेळण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार दोन्ही सामने हे सकाळी ९ वाजता सुरू होतील.

Bangladesh Squad vs India ODI: भारत वनडे स्क्वॉड

रोहित शर्मा (कप्तान), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, वाशिंगटन सुंदर, रविंद्र जडेजा, शाहबाज अहमद, अक्षर पटेल, लोकेश राहुल, ऋषभ पंत (यष्टी रक्षक) , ईशान किशन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, कुलदीप सेन

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com