India's tour of Zimbabwe : झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूंना मिळाली संधी

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका १८ ऑगस्टपासून सुरु होणार आहे.
Team India
Team IndiaSaam Tv

नवी दिल्ली : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका १८ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी बीसीसीआयने (bcci) भारतीय संघाची घोषणा केली आहे. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या राहुल त्रिपाठीला भारतीय संघात (Indian cricket team) संधी मिळाली आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज दीपक चहरचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. तसंच कौंटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरलाही पुन्हा संधी मिळाली आहे.

Team India
राहुल द्रविडच्या 'त्या' प्लानवर टीम इंडियाचा माजी कर्णधार भडकला

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून शिखर धवनकडे कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. शिखरच्या नेतृत्वात भारतीय संघाने वेस्ट इंडिजच्या विरोधात झालेली मालिका ३-० ने जिंकली. दरम्यान, निवड समितीने वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात होणारा पहिला एकदिवसीय सामना १८ ऑगस्टला होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना २० ऑगस्ट आणि तिसरा सामना २२ ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे. सर्व सामने हरारे स्पोर्ट क्लबमध्ये खेळवले जाणार आहेत.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणी

शिखर धवन (कर्णधार ), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, ईशान किशन (विकेटकिपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल,आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com