IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याआधी पोलिसांचा लाठीचार्ज; ७ जण जखमी

पोलिसांनी सामन्याचे तिकीट खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांवर लाठीचार्ज केलाय.
CCricket Fans And Police Clash Video Viral
CCricket Fans And Police Clash Video ViralSaam TV

नवी दिल्ली : भारत (Team India) आणि ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) ३ सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना हा मोहालीत खेळवण्यात आलाय. तर दुसरा सामना उद्या म्हणजेच 23 सप्टेंबर रोजी नागपुरात होणार होणार आहे. याव्यतिरिक्त तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना हैदराबाद येथे होणार आहे. मात्र, याआधीच हैदराबादमध्ये मोठा गदारोळ झालाय.

CCricket Fans And Police Clash Video Viral
IND vs AUS : दुसऱ्या टी-२० सामन्यांत भारतीय संघात होणार बदल; अशी असू शकते 'प्लेईंग ११'

पोलिसांनी सामन्याचे तिकीट खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांवर लाठीचार्ज केलाय. या लाठीचार्जमध्ये जवळपास ७ जण जखमी झाल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार, हैदराबादमध्ये होणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्याचे तिकीट खरेदी करण्यासाठी लोकांनी तुफान गर्दी केली होती.

३ वर्षानंतर प्रथमच हैदराबाद येथे सामना होणार असल्याने तिकीट खरेदीसाठी जवळपास २० हजारांहून अधिक क्रिकेटप्रेमी मैदानाबाहेर जमले होते. या सामन्याचा आनंद लुटता यावा म्हणून लोकांनी पहाटे ३ वाजेपासूनच तिकीट खरेदीसाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.

दरम्यान, बघता, बघात गर्दी वाढतच गेली आणि जमाव नियंत्रणाबाहेर गेला. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. पोलिसांनी लाठीचार्ज सुरू करताच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. यामध्ये ४ महिला ३ पुरूष आणि एका पोलीस कर्मचाऱ्यासह एकूण ७ जण जखमी झाले आहेत.

हैदराबादमध्ये चाहते बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचची वाट पाहत होते. ३ वर्षानंतर २५ सप्टेंबरला त्यांची ही प्रतिक्षा संपणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल आणि अन्य स्टार्सना पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. हैदराबादमध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर २०१९ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध झाला होता. त्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय मॅच झालेली नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com