India vs Australia: हार्दिक पंड्याची तुफानी खेळी; भारताचे ऑस्ट्रेलियाला २०९ धावांचे आव्हान

भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला २०९ धावांचे आव्हान दिलं आहे.
IND vs AUS T20 match
IND vs AUS T20 matchsaam tv

IND vs AUS T20 match : IND vs AUS T20 match : भारताची (India) ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्याची टी२० मालिका सुरू झाली असून पहिला सामना मोहालीमध्ये सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी जोरदार फलंदाजी केली. लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांच्या जबरदस्त खेळीमुळे भारताने धावांचा मोठा डोंगर उभारला आहे. भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला २०९ धावांचे आव्हान दिलं आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिायाची फलंदाजीची सुरुवात खराब झाली. रोहित आणि विराट लवकर बाद झाले. त्यामुळे भारताची मदार ही मध्यल्या फळीतील फलंदाजांवर होती. रोहित आणि विराट बाद झाल्यानंतर लोकेश राहुलने डाव सावरत धडाकेबाज अर्धशतक ठोकलं.

हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांनी देखील तुफानी खेळ दाखवला. लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांच्या फलंदाजीवर भारताने २०८ धावापर्यंत मजल मारली. हार्दिक देखील ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना तुफान फॉर्ममध्ये दिसला. हार्दिकने ३० चेंडूमध्ये सात चौकार आणि पाच षटकाराच्या जोरावर नाबाद ७१ धावा कुटल्या.

IND vs AUS T20 match
टी-२० क्रिकेटमधील नवा 'इम्पॅक्ट प्लेयर' नियम माहितेय का? BCCI ने दिली 'ही' महत्वाची माहिती

हार्दिकने केवळ २५ चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. भारताने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवर ६ गडी गमावले. दिनेश कार्तिक या सामन्यात फारशी कमाल दाखवू शकला नाही. दिनेश कार्तिक अवघ्या ६ धावांवर पायचीत झाला. लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या या तिघांच्या तुफानी खेळीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाला २०९ धावांचे आव्हान दिलं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com