Ind Vs Aus Playing XI: टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मधून हे खेळाडू होणार बाद; तिसऱ्या वनडेसाठी तगडा प्लान

Ind Vs Aus Playing XI Prediction : दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागल्यानंतर तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?
India vs Australia Playing 11 Prediction
India vs Australia Playing 11 PredictionTwitter/BCCI

India Vs Australia 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना २२ मार्च (बुधवार) रोजी चेन्नईमध्ये होणार आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात ५ विकेट राखून विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं १० विकेट राखून भारताला पराभूत केलं.

भारत-ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) यांच्यातील तिसरा सामना निर्णायक असेल. हा सामना जो संघ जिंकेल तो मालिका खिशात घालणार आहे. चेन्नईत दुपारी दीड वाजता हा सामना होणार आहे. (Cricket News Update)

सूर्यकुमार यादव प्लेइंग ११ मधून आऊट?

तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघातील (Team India) खेळाडूंच्या निवडीवरही चाहत्यांचे लक्ष असेल. दोन सामन्यांत ऑस्ट्रेलियाचा तेजतर्रार गोलंदाज मिशेल स्टार्कच्या समोर टीम इंडियाच्या आघाडीच्या खेळाडूंनी सपशेल मान टेकली होती आणि हा चिंतेचा विषय आहे.

सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. दोन्ही सामन्यांतील पहिल्या चेंडूवर स्टार्कने त्याला पायचीत केले. त्यामुळं आता तिसऱ्या वनडेत सूर्यकुमारला संधी दिली जाते का, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. दुसरीकडे रोहित शर्माने मात्र त्याला आणखी संधी देण्याचे संकेत दिले आहेत.

India vs Australia Playing 11 Prediction
Viral Video: गल्लीतला एबी डिविलियर्स; भन्नाट शॉट पाहून तुम्हीही म्हणाल, दिल मे आता है, समझ में नहीं!

काय म्हणाला होता रोहित शर्मा?

दुसऱ्या वनडेनंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) प्रतिक्रिया दिली होती. मला श्रेयस अय्यरच्या वापसीबद्दल माहिती नाही. श्रेयसला पर्याय अजून मिळालेला नाही. त्यामुळे आम्ही सूर्यकुमारला मैदानात उतरवू.

ज्याच्यात क्षमता आहे, त्याला संधी मिळणारच असं मी अनेकदा म्हणालो आहे. वनडेतही चांगली कामगिरी करावी लागेल हे सूर्याला ठाऊक आहे. गेल्या दोन सामन्यांत तो लगेच बाद झाला. पण त्याला सात-आठ किंवा दहा सामन्यांमध्ये लागोपाठ संधी द्यावी लागेल, असे तो म्हणाला होता.

India vs Australia Playing 11 Prediction
IPL 2023: आयपीएलचा यंदाचा सीजन वेगळाच असणार; नव्या नियमांमुळे सामन्यात कधीही ट्वीस्ट येणार, जाणून घ्या सविस्तर

अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग ११

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या सामन्यात आक्रमक रणनीती अवलंबू शकतो. आपल्या तीन खास गोलंदाजांना मैदानात उतरण्याची शक्यता आहे. अशात शार्दुल ठाकूर किंवा उमरान मलिकला संधी मिळू शकते. मलिकला खेळण्याची संधी मिळू शकते, कारण त्याच्याकडे अतिरिक्त वेग आहे आणि तो अधिक यशस्वी ठरू शकतो.

उमरान मलिक किंवा शार्दुल ठाकूरला संधी मिळाली तर, अक्षर पटेलला बाहेर राहावं लागू शकतं. तर कुलदीप यादवच्या ऐवजी वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली जाऊ शकते. सुंदर फलंदाजीसह गोलंदाजीतही कमाल करू शकतो. पण फलंदाजी क्रमात कोणताही बदल दिसू शकणार नाही.

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com