
Ravindra Jadeja: न्यूझीलंडविरुद्धची टी ट्वेंटी मालिकेत भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला. शेवटच्या सामन्यात शुभमन गिलच्या वादळी शतकाच्या जोरावर भारतीय संघाने विजय साकारला. न्यूझीलंडविरुद्ध आधी एकदिवसीय आणि आता टी ट्वेंटी मालिकेत धुळ चारल्यानंतर भारतीय संघ (Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडणार आहे.
जडेजाची संघात ऍंट्री...
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा पहिल्या कसोटीसाठी तंदुरुस्त झाल्यामुळे भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने रवींद्र जडेजाला तंदुरुस्त घोषित केले आहे. म्हणजेच नागपुरात होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात तो निवडीसाठी उपलब्ध असेल. रवींद्र जडेजा दुखापतीमुळे बराच काळ संघाबाहेर होता.
रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) शेवटचा टीम इंडियाकडून ऑगस्ट २०२२ मध्ये खेळला होता, जेव्हा तो आशिया कपमध्ये खेळत होता. येथेच रवींद्र जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली, त्यानंतर तो क्रिकेटपासून दूर राहिला. पाच महिन्यांच्या ब्रेकमध्ये, रवींद्र जडेजा 2022 टी-20 विश्वचषक देखील चुकला आणि अनेक मोठ्या मालिकांमध्ये खेळू शकला नाही.
भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक...
पहिली कसोटी - 9 ते 13 फेब्रुवारी, नागपूर
दुसरी कसोटी - १७ ते २१ फेब्रुवारी, दिल्ली
तिसरी कसोटी - 1 ते 5 मार्च, धर्मशाला
चौथी कसोटी - 9 ते 13 मार्च, अहमदाबाद
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.