
Ind Vs Aus Test Series: न्यूझीलंडला धुळ चारल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. येत्या ९ फेब्रूवारीपासून नागपुरमध्ये या मालिकेतील पहिला कसोटी सामना रंगणार आहे. या मालिकेसाठी दोन दिवसांपुर्वीच ऑस्ट्रेलियाचा संघ नागपुरात दाखल झाला आहे.
भारतीय संघही नागपुरात दाखल झाला असून नागपुरमध्ये सध्या एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. नागपुरच्या चौकाचौकात शुभमन गुलचे बॅनर पाहायला मिळत आहेत. या बॅनरवरुन उमेश यादवनेही गिलची जोरदार फिरकी घेतली आहे. (Nagpur)
भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या टी ट्वेंटी सामन्यात गिलने धडाकेबाज शतकी खेळी केली. या आधी झालेल्या एकदिवसीय सामन्यातही गिलने एक द्विशतकी खेळीही केली.
भारत-न्यूझीलंड टी२० मालिकेदरम्यान सामना पाहण्यासाठी आलेल्या एका मुलीच्या हातातले पोस्टर व्हायरल झाले होते. या मुलीने पोस्टरमध्ये लिहिले होते, “शुबमनसोबत टिंडर मॅच करा.” हेच बॅनर सध्या नागपुरात झळकत आहेत. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
टिंडर कंपनीच्या या स्टंटमध्ये आता भारताचा गोलंदाज उमेश यादवनेही शुबमन गिलची फिरकी घेतली आहे. हे पोस्टर्स शेअर करताना उमेशने शुबमन गिलला “संपूर्ण नागपूर पाहत आहे. शुबमन, आता बघ. विचार कर…” असे मजेशीर ट्विट केले आहे.
"नागपुरात शुक्रवार, ३ फेब्रुवारी रोजी अनेक रस्त्यांच्या कडेला, खांबांवर आणि दुकानांच्या छतावर गुलाबी रंगाचे मोठमोठे होर्डिंग्ज दिसले. त्यात काय लिहिले आहे यावर प्रथम विश्वास ठेवणे कठीण होते मात्र नंतर मला हसू आवरता येत नव्हते," असेही उमेश यादवने या ट्विटमध्ये म्हणले आहे.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील चार कसोटी मालिका खेळल्या जाणार आहेत. ज्यामधील पहिला कसोटी सामना ९ फेब्रूवारीपासून रंगणार आहे. (Indian Cricket Team)
भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक...
पहिली कसोटी - 9 ते 13 फेब्रुवारी, नागपूर
दुसरी कसोटी - १७ ते २१ फेब्रुवारी, दिल्ली
तिसरी कसोटी - 1 ते 5 मार्च, धर्मशाला
चौथी कसोटी - 9 ते 13 मार्च, अहमदाबाद
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.