IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडला 'गिल' वादळाचा तडाखा; तीच नजाकत, अप्रतिम फटके, तडकावलं तुफानी शतक

87 चेंडू खेळल्यानंतर गिलने 14 चौकार आणि 2 षटकारांसह आपले शतक पूर्ण केले.
Shubman Gill
Shubman GillSaam TV

IND vs NZ 1st ODI Live Updates : टीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने धमाकेदार फॉर्म कायम ठेवत आणखी एक उत्कृष्ट खेळी केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावल्यानंतर गिलने न्यूझीलंडच्या गोलंदाजांनाही चांगलंच धुतलं आहे. गिलने सलग दुसऱ्या वनडेत शतक झळकावून आपला दमदार फॉर्म कायम ठेवला. गिलचा खेळ पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक होत असून त्याने गेल्या ११ डावात ३ शतके झळकावली आहेत. (Sports News)

Shubman Gill
Suryakumar yadav : सूर्यकुमारला एकदिवसीय सामन्यात करिष्मा दाखवण्याची संधी; ODI विश्वचषकातही होऊ शकते एन्ट्री

न्यूझीलंडविरुद्ध अप्रतिम खेळी खेळताना शुभमन गिलने केवळ ५२ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५० धावा पूर्ण केल्या. यानंतर त्याने आपल्या डावाला गती देताना मोठे चौकार मारत सलग दुसरे शतक झळकावले. ८७ चेंडू खेळल्यानंतर गिलने १४ चौकार आणि २ षटकारांसह आपले शतक पूर्ण केले.

शुबमनने केलेल्या दमदार खेळीच्या बळावर टीम इंडियाच्या (Team India) ३३ षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात २०० धावा पूर्ण झाल्या आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना हैदराबाद येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. (Latest Marathi News)

Shubman Gill
Rishabh Pant Health Update : रिषभ पंत क्रिकेटच्या मैदानात कधी? हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

नाणेफेक जिंकल्यानंतर या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या विकेट्साठी शानदार फलंदाजी केली. कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिलने ६० धावांची भागीदारी केली. त्यानंतर रोहित शर्मा बाद झाला.कर्णधार रोहित शर्माने आजच्या सामन्यात ३८ चेंडूत ३४ धावा केल्या. या दरम्यान त्याने आपल्या खेळीत २ षटकार आणि ४ चौकार लगावले.

त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेला विराट कोहली फक्त ८ धावा काढून माघारी परतला. केएल राहुलच्या जागी संधी मिळालेल्या इशान किशनलाही फारशी चमक दाखवता आली नाही. लॉकी फर्ग्यूसनने वेगवाग गोलंदाजी करत त्याला अडचणीत आणले. किशन फक्त ५ धावाच करू शकला.

इशान किशन झटपट माघारी परतल्यानंतर एकवेळ भारतीय संघाची अवस्था ३ बाद ११० अशी झाली होती. मात्र, त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) गिललच्या मदतीने डाव सावरला. दोघांनी मिळून चौथ्या विकेट्साठी जवळपास ६० धावा जोडल्या. भन्नाट फॉर्ममध्ये असलेला सूर्यकुमार यादव ३१ धावा काढून माघारी परतला. एकीककडे भारतीय फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत असताना, गिलने दुसरी बाजू लावून धरली त्याने ८७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com