IND vs NZ: टीम इंडिया उद्या न्यूझीलंडशी भिडणार, प्लेइंग ११ मध्ये होणार धक्कादायक बदल

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात उद्या पहिला टी २० सामना होत आहे.
india vs new zealand 1st t20 / @bcci
india vs new zealand 1st t20 / @bcciSAAM TV

India vs New Zealand: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात उद्या, शुक्रवारी वेलिंग्टनमध्ये पहिला टी २० सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाचं नेतृत्व हार्दिक पंड्याकडे (Hardik Pandya)  सोपवलं आहे. उद्याच्या सामन्यासाठी हार्दिक पंड्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे.

पंड्याच्या नेतृत्वात न्यूझीलंडशी भिडणार

पहिल्या टी २० सामन्यात रिषभ पंत आणि शुभमन गिल हे दोघे डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाकडून रिषभ पंतला सलामीला पाठवण्याची दाट शक्यता आहे. रिषभसाठी ही मोठी संधी असेल. न्यूझीलंडविरुद्ध भारताचा दुसऱ्या फळीतील संघ उतरणार आहे. तरीही बरेच खेळाडू अनुभवी आहेत. (Cricket News)

प्लेइंग इलेव्हन कशी असेल?

चार वर्षांपूर्वी न्यूझीलंडमध्ये झालेल्या अंडर १९ वर्ल्डकपमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलला वेलिंग्टन टी २० सामन्यात पदार्पणाची अपेक्षा आहे. गेल्या १२ महिन्यांत इशान किशनला नियमितपणे सलामीला खेळण्याची संधी देण्यात आली होती. आता या मालिकेत त्याला स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी आहे.

india vs new zealand 1st t20 / @bcci
IND vs NZ : भारत-न्यूझीलंड सामने टीव्हीवर दिसणार नाही? मग कुठे पाहता येतील?

या विस्फोटक फलंदाजाला संधी?

संजू सॅमसन याला आणखी एक मोठी संधी यानिमित्तानं मिळाली आहे. या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी संजूवर आहे. वॉशिंग्टन सुंदरही या मालिकेतून पुनरागमन करू शकतो. फलंदाजी आणि गोलंदाजीतही तो चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.

प्लेइंग इलेव्हनमध्ये या गोलंदाजांना मिळू शकेल का संधी?

न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या टी २० मालिकेत कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या दोघांना पुन्हा एकत्रित गोलंदाजी करण्याची संधी मिळू शकते. जसप्रीत बुमराहसोबत एका वेगवान गोलंदाजाचा शोध टीम इंडिया घेत आहे. अशात उमरान मलिक हा उत्तम पर्याय आहे.

न्यूझीलंडमध्ये भुवनेश्वर आणि अर्शदीप सिंग नव्या चेंडूंने गोलंदाजी करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वर्ल्डकप स्पर्धेत हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराजला संधी मिळाली नव्हती. पण या मालिकेत प्लेइंग इलेव्हनमध्ये या दोघांनाही संधी मिळू शकते.

india vs new zealand 1st t20 / @bcci
Ind Vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी हार्दिक पंड्या बरंच काही बोलून गेला, सांगितल्या ५ महत्वाच्या गोष्टी

न्यूझीलंड संघ पुढीलप्रमाणे

केन विलियमसन (कर्णधार), फिन एलेन, मायकल ब्रेसवेल, डेवोन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, डेरेल मिशेल, एडम मिल्ने, जिमी निशाम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सॅण्टनर, टीम साउदी, ईश सोढी, ब्लेअर टिकनेर.

भारतीय संघ

हार्दिक पंड्या (कर्णधार), रिषभ पंत, ईशान किशन, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com