Ind vs NZ : रिषभ पंत करणार ओपनिंग? ५ फलंदाज शर्यतीत, कुणाला संधी मिळणार?

न्यूझीलंडविरुद्धच्या टी २० मालिकेत सलामीला कोण येऊ शकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
India vs New Zealand 1st T20I
India vs New Zealand 1st T20I saam tv

India vs New Zealand, 1st T20I : भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ टी २० वर्ल्डकपच्या सेमिफायनलमध्ये स्पर्धेबाहेर झाले. त्यानंतर हे दोन्ही संघ आता टी २० मालिकेत आमनेसामने येणार आहेत. तीन टी २० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हा वेलिंग्टन येथे शुक्रवारी होणार आहे. या मालिकेत टीम इंडिया युवा खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे.

रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांसारख्या सिनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर हार्दिक पंड्याकडे (Hardik Pandya) नेतृत्व सोपवलं आहे. आता या दिग्गज फलंदाजांच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची यंग ब्रिगेड कशी असेल. फलंदाजी क्रमवारीत सलामीला कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Cricket News)

India vs New Zealand 1st T20I
Ind Vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी हार्दिक पंड्या बरंच काही बोलून गेला, सांगितल्या ५ महत्वाच्या गोष्टी

टी २० मालिकेत सलामीला कोण येणार? या प्रश्नाचं उत्तर आता हार्दिक पंड्या आणि कोच व्हीव्हीएस लक्ष्मण यांना शोधावं लागणार आहे. भारतीय संघातील पाच फलंदाज सलामीसाठी दावेदार आहेत. अशात ओपनिंगला नक्की कोण येऊ शकतो.

रिषभ पंत करणार ओपनिंग?

न्यूझीलंडविरुद्धच्या टी २० मालिकेत रिषभ पंत हा उपकर्णधार आहे. रिषभला सलामीला पाठवावे, अशी मागणी सातत्याने होत आहे. पंतला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सलामीला पाठवलं होतं. मात्र त्याची बॅट तळपली नाही. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पंत ओपनिंगला यायचा. अशा वेळी त्याला सलामीला संधी दिली जाऊ शकते. पंत हा सलामीवीर म्हणून योग्य पर्याय ठरू शकतो, असे मानले जात आहे. रिषभ आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्यामुळे सुरुवातीच्या सहा षटकांत वेगाने धावा करण्याची त्याच्यात क्षमता आहे.

India vs New Zealand 1st T20I
India vs New Zealand: टीम इंडियाचा चेहरामोहरा बदलला, आता रोहित शर्मा नाही, हार्दिक पंड्या झाला कर्णधार

इशान किशन संधी मिळेल?

डावखुरा फलंदाज इशान किशन हा देखील सलामीला येऊ शकतो. किशन याने टी २० मध्ये सलामीला खेळताना विस्फोटक सुरुवात करून दिली आहे. मात्र, टी २० वर्ल्डकपमध्ये त्याला संधी मिळू शकली नव्हती. आता इशान किशनला २०२४ टी २० वर्ल्डकप बघता आतापासूनच संधी दिली तर, तो एक चांगला पर्याय ठरू शकतो, असे तज्ज्ञांना वाटतं.

संजू सॅमसन उत्तम पर्याय

संजू सॅमसन हा टी २० मालिकेत सलामीला येऊ शकतो. संजू मधल्या फळीतही चांगली फलंदाजी करतो. टीम इंडियामधील पुढील फिनिशर म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. मात्र, टी २० प्रकारात सॅमसनकडे सलामीवीर म्हणून बघितले जाते.

दीपक हुड्डा आणि शुभमन गिल दावेदार

दीपक हुड्डा हा देखील ओपनिंगचा दावेदार आहे. आयर्लंडविरुद्धच्या टी २० मालिकेत हुड्डाने पहिल्या फळीत फलंदाजी केली होती. त्यानं शतकही झळकावलं होतं. अशावेळी हुड्डा हा देखील उत्तम पर्याय असू शकतो. दुसरीकडे शुभमन गिल देखील ओपनिंगचा दावेदार आहे. गिल हा आयपीएलमध्ये ओपनिंगला येतो. वनडे आणि कसोटी प्रकारातही गिलला सलामीला फलंदाजी करण्याचा चांगला अनुभव आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com