
Ind Vs NZ 2nd ODI: एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या तयारीत असलेल्या टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताने शनिवारी रायपूर एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. म्हणजेच ही मालिकाही भारताच्या (Team India) नावावर झाली असून आता या मालिकेतील शेवटचा सामना २४ जानेवारीला होणार आहे.
टीम इंडियाला घरच्या मैदानावर पराभूत करणे सोपे नाही, विशेषत: द्विपक्षीय मालिकेत टीम इंडियाचा रेकॉर्ड मजबूत होत आहे. हे जाणून आश्चर्य वाटेल की टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग सातवी एकदिवसीय मालिका जिंकली आहे आणि यापैकी बहुतेक मालिकेत त्याने विरोधी संघाला धूळ चारली आहे. म्हणजेच भारताला भारतात पराभूत करणे म्हणजे अभेद्य किल्ला भेदण्यासारखे आहे.
शेवटच्या 10 एकदिवसीय मालिका (भारतात)
1. न्यूझीलंड विरुद्ध (2023) - टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर आहे (3 सामन्यांची मालिका)
2. श्रीलंकाविरुद्ध (2023) - टीम इंडियाने 3-0 (3 सामन्यांची मालिका) जिंकली
3. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध (2022) - टीम इंडियाने 2-1 (3 सामन्यांची मालिका) जिंकली.
4. वेस्ट इंडिजविरुद्ध (2022 )- भारताने 3-0 (3 सामन्यांची मालिका) जिंकली
5. इंग्लंडविरुद्ध (2021) - भारताने 2-1 (3 सामन्यांची मालिका) जिंकली
6. ऑस्ट्रेलियाविरुद्ध (2020) - भारताने 2-1 (3 सामन्यांची मालिका) जिंकली
7. वेस्ट इंडिजविरुद्ध (2020 ) - भारताने 2-1 (3 सामन्यांची मालिका) जिंकली
8. ऑस्ट्रेलियाविरुद्ध (2019 )- भारत 2-3 (5 सामन्यांची मालिका) गमावली
9. वेस्ट इंडीजविरुद्ध (2019 ) - भारताने 3-1 (5 सामन्यांची मालिका) जिंकली
10. श्रीलंकाविरुद्ध (2018) - भारताने 2-1 (3 सामन्यांची मालिका) जिंकली
दरम्यान, दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने (New Zealand) भारतासमोर 109 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 20.1 षटकात 2 विकेट्स गमावत 111 धावा करत विजय निश्चित केला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.