
Ind Vs NZ 2nd ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना रायपुरच्या वीर नारायण सिंग मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंड संघाला मात्र एकापाठोपाठ एक धक्के मिळाल्याचे दिसत आहेत. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचे कंबरडे मोडत निम्मा संघ तंबूत पाठवला आहे. (Indian Cricket Team)
भारताचे स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी मिळून रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला शानदार सुरुवात करून दिली. या दोघांनी मिळून न्यूझीलंडला 9 धावांत 3 गडी बाद केले. शमीने किवी सलामीवीर फिन ऍलन आणि डॅरेल मिशेल यांना स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये पाठवले, तर सिराजने हेन्री निकोल्सला बाद केले.
प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाची सुरूवात अत्यंत खराब झाली. पहिल्याच षटकात भारतीय संघ वर्चस्व गाजवताना दिसला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने किवी सलामवीर फिन ऍलनला क्लीन बोल्ड केले. स्टार वेगवान गोलंदाज हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) 15 धावांवर न्यूझीलंड संघाला चौथा धक्का दिला. पंड्याने डेव्हॉन कॉनवेला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. कॉनवेने 16 चेंडूत 7 धावा केल्या.
भारतीय संघाने न्यूझीलंड संघाचा निम्मा संघ केवळ 15 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवला. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने पाचवा धक्का दिला. त्याच्या चेंडूवर किवी संघाचा कर्णधार टॉम लॅथम १७ चेंडूत एक धावा काढून झेलबाद झाला.
शमी- सिराजच्या नावावर मोठ्या विक्रमांची नोंद...
घरच्या मैदानावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा शमी हा 15 वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. तर दुसरीकडे, सिराजने 2022 पासून एकदिवसीय सामन्यांमध्ये पॉवरप्लेमध्ये 25 विकेट घेतल्या.
अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1000 चेंडू टाकत 782 धावा दिल्या. यावेळी त्याची सरासरी 4.71 होती. सिराजने 21.11 च्या सरासरीने 37 विकेट घेतल्या.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.