IND vs NZ 2nd T20 : टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडची दाणादाण; जिंकण्यासाठी भारताला १०० धावांचं आव्हान

टीम न्यूझीलंडने टीम इंडियाला 100 धावांचे आव्हान दिलं आहे
IND vs Nz 2nd T20
IND vs Nz 2nd T20 Saam tv

India vs New Zealand 2nd T20 : आज भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेचा दुसरा सामना लखनऊमधील इकाना मैदानात सुरू आहे. आजच्या सामन्यात टीम न्यूझीलंडने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, टीम इंडियाच्या गोलंदाजीपुढे न्यूझीलंड संघ फार काही कमाल दाखवू शकला नाही. टीम न्यूझीलंडने टीम इंडियाला 100 धावांचे आव्हान दिलं आहे. (Latest Marathi News)

IND vs Nz 2nd T20
U-19 T20 World Cup: Team India च्या मुलींनी रचला इतिहास! फायनलमध्ये इंग्लडचा धुरळा; विश्वचषकावर कोरले नाव

टी-२० मालिकेचा पहिला सामना भारताने हरल्याने टीम इंडिया मालिकेत १-० ने मागे आहे. त्यामुळे विजयाच्या इराद्याने उतरलेल्या टीम इंडिया कमालीचे प्रदर्शन दाखवलं. टीम इंडियाच्या गोलंदाजीपुढे न्यूझीलंडचे फलंदाज ढेपाळले.

नाणेफेकी जिंकल्यानंतर मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात चांगली केली. मात्र, टीम इंडियांच्या गोलंदाजांनी भेदक मारे करण्यास सुरुवात केल्यानंतर न्यूझीलंड (New Zealand) संघ ढेपाळला. न्यूझीलंडचा स्टार खेळाडू कॉन्वे हा ११ धावा करून तंबूत परतला. तर सातव्या षटकात न्यूझीलंडला तिसरा धक्का बसला. फिलिप्स त्रिफळाचीत झाला. त्याने केवळ ५ धावा कुटल्या.

IND vs Nz 2nd T20
Australia Open 2023: जोकोव्हिचने रचला इतिहास! जिंकले ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद; राफेल नदालच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी

कुलदीपने मिचेलला बाद करत न्यूझीलंडला चौथा धक्का दिला. त्यानंतर मार्क चॅपमॅन हा धावबाद झाला. त्याने केवळ १४ धावा केल्या. ब्रेसवेलला कर्णधार हार्दिक पंड्याने झेलबाद केले. तर पुढे अर्शदीपने १८ व्या षटकात न्यूझीलंडला २ झटके दिले.

त्याने सोढी आणि फर्ग्युसनला बाद केले. तर न्यूझीलंड मिचेल सँटनर आणि डफी नाबाद राहिले. सँटनरने १९ आणि डफीने ६ धावा केल्या. टीम इंडियाकडून (Team India) अर्शदीपने सर्वाधित २ गडी बाद केले. तर चहल, कुलदीप, हुड्डा, सुंदर और हार्दिकने एक-एक गडी बाद केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com