
India vs New Zealand 3rd ODI : न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने विजयाला गवसणी घातली आहे. टीम इंडियाने ३८६ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरेलल्या न्यूझीलंडचा संघ २९५ धावांवर गारद झाला. टीम इंडिया तिसऱ्या सामना तब्बल ९० धावांनी जिंकल्याने मालिकाही खिशात टाकली आहे. (Latest Marathi News)
सलग दोन पराभवानंतर जिंकण्याच्या इराद्याने मैदानात फलंदाजीसाठी उतरलेली टीम न्यूझीलंडची फलंदाजीची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. टीम इंडियाच्या (Team India) ३८६ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम न्यूझीलंडला पहिल्याच षटकात धक्का बसला.
हार्दिक पंड्याने अॅलेनला त्रिफळाचित केले. त्यामुळे संघाचा सलामीवीर बाद झाल्याने न्यूझीलंडवर दबाव वाढला. मात्र, या परिस्थितीत हेनरी निकोलसने डाव सांभाळला. मात्र, कुलदीप यादवच्या भेदक माऱ्यामुळे निकोलस हा ४२ धावांवर बाद झाला.
निकोलसनंतर डिव्हॉन कॉन्वेने मैदानात उतरला. कॉन्वे तुफान फॉर्ममध्ये दिसला. कॉन्वेने शतकी खेळी खेळली. कॉन्वेने ७१ चेंडूमध्ये शतक पूर्ण केले. त्यानंतर शार्दुल ठाकूरने मिचेल आणि कॉन्वेची भागिदारी तोडली.
शार्दुलने मिचेलला झेलबाद केले. शार्दुलच्या भेदक माऱ्याने न्यूझीलंडला संकटात आणलं. तर शार्दुलने न्यूझीलंडचा कर्णधार लँथमलाही बाद केलं. शार्दुलने दोन षटकात न्यूझीलंडला (New Zealand) ३ झटके दिले.
टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या भेदक मारा टीम न्यूझीलंडला चांगलाच महागात पडला. १३८ धावानंतर कॉन्वे देखील उमरान मलिकच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर ब्रेसवेल देखील २६ धावा करून स्वस्तात बाद झाला.
त्यानंतर कुलदीप यादवे पुन्हा न्यूझीलंडचा आठवा गडी तंबूत पाठवला. त्यानंतर चहलने डफीला बाद केले. त्यानंतर दहावा गडी स्वस्तात माघारी परतला. त्यामुळे टीम इंडिया ९० धावांनी जिंकत न्यूझीलंडचा सुफडा साफ केला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.