
IND vs NZ 3rd ODI Live Updates : भारत आणि न्यूझीलंड संघादरम्यान, तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करायला आलेल्या रोहित शर्मा आणि शुबमन गिलच्या जोडीने किवी संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी उत्कृष्ट खेळ दाखवत आपआपली शतके साजरी केली. (Latest Marathi News)
रोहित शर्माने (Rohit Sharma) ८३ चेंडूत १०१ धावा कुटल्या. या खेळीत ९ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे. तर शुभमन गिलने ७८ चेंडूत ११२ धावांची विस्फोटक खेळी केली. आपल्या धडाकेबाज खेळीत त्याने १३ चौकार आणि ४ षटकारांचा पाऊस पाडला.
दरम्यान, रोहित आणि शुभमन दोघेही आपआपल्या शतकानंतर बाद झाले. सलामी जोडीने दिलेल्या दमदार सुरूवातीमुळे ३० व्या षटकात टीम इंडियाची धावसंख्या २ बाद २३८ इतकी झाली होती. विराट कोहली (Virat Kohli) १९ आणि इशान किशन १ धावा बनवून मैदानावर होते.
दरम्यान, मालिकेतील पहिले २ सामने जिंकून यजमान भारतीय संघाने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. मात्र भारतीय संघासाठी आजचा सामना केवळ औपचारिकताच असला तरी आयसीसी रॅकिंग मध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचण्याची संधी आहे.
भारतीय संघात दोन बदल
भारताने या सामन्यात आपल्या प्लेईंग ११ मध्ये दोन बदल केले असून मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती देण्यात आली आहे. दोघांच्या जागी उमरान मलिक आणि युजवेंद्र चहलला अंतिम अकरा मध्ये स्थान देण्यात आले आहे. तर न्यूझीलंडने संघात एक बदल केला असून वेगवान गोलंदाज शिपलीला वगळले आहे. त्याच्या जागी जेकब डफीला संघात स्थान देण्यात आले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.