IND vs NZ: अजिंक्य रहाणे कर्णधार; शर्मा,पंत,बुमराह,शमीला ब्रेक

न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने संघाची निवड केली आहे.
ajinkya rahane
ajinkya rahane

मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार राेहित शर्मासह, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे. आज (शुक्रवार) जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे साेपविण्यात आले आहे. विराट कोहली हा दुसऱ्या कसोटीसाठी संघात सहभागी होईल आणि संघाचे नेतृत्व करेल असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. india new zealand test ajinkya rahane to lead team india rest for rohit sharma virat kolhi

ajinkya rahane
महाराष्ट्र कन्येने पटकाविला मल्लखांबाचा पहिला 'अर्जुन' पुरस्कार

न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने संघाची निवड केली आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या भारतीय संघात अजिंक्य रहाणे (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, आर. अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मो. सिराज, प्रसीध कृष्णा यांचा समावेश आहे.

येत्या २५ नाेव्हेंबरला कानपूर येथे पहिला कसाेटी सामना हाेईल. त्यानंतर तीन डिसेंबरला मुंबई येथे दूसरा कसाेटी सामना हाेईल. दूस-या कसोटी सामन्यात विराट कोहलीचा संघात समावेश असेल. विराट संघाचे नेतृत्व करेल असे बीसीसीआयने म्हटलं आहे.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com