Shubhman GIll Record : गिलची १ धाव कमी पडली अन् बाबरचा रेकॉर्ड तुटता तुटता राहिला, तरीही केली बरोबरी

क्रिकेटच्या मैदानात धावांचा पाऊस पाडणाऱ्या शुभमन गिलने आणखी एक शतक धमाकेदार खेळी केली.
Shubhman GIll Record
Shubhman GIll RecordSaam TV

Shubhman GIll Record : क्रिकेटच्या मैदानात धावांचा पाऊस पाडणाऱ्या शुभमन गिलने आणखी एक शतक धमाकेदार खेळी केली. आठवड्याभरापूर्वी द्विशतक झळकावणाऱ्या शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही दमदार शतक ठोकलं. त्याने ७८ चेंडूंच्या खेळीत ११२ धावांची खेळी केली. (Sport News)

Shubhman GIll Record
Shubman Gill : 4, 4, 4, 6, 4 शुभमन गिलने एकाच ओव्हरमध्ये कुटल्या इतक्या धावा; रोहित फक्त बघतच राहिला!

आपल्या धडाकेबाज खेळीत गिलने १३ चौकार आणि ४ षटकारांचा पाऊस पाडला. त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. गेल्या तीन सामन्यांत गिलचे हे दुसरे शतक आहे. पहिल्या सामन्यांत त्याने २०८ धावांची विस्फोटक खेळी केली होती. शुभमन ११२ धावांवर बाद झाला. (India vs New Zealand)

गिलने शिखर धवनचा रेकॉर्ड मोडला

आपल्या छोट्याशा करिअरमधलं शुभमन गिलचे हे चौथे वनडे शतक आहे. या शतकासह गिल सर्वात कमी सामन्यात ४ शतके करणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. त्याचा हा २१वा सामना आहे. शुभमनच्या आधी हा विक्रम शिखर धवनच्या नावावर होता. धवनने २४ व्या एकदिवसीय डावात ४ शतकं झळकावली होती.

Shubhman GIll Record
IND vs NZ 3rd ODI : रोहित-गिलने न्यूझीलंडला धुतलं; दोघांनाही झळकावली शतकं; भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

बाबर आजमच्या रेकॉर्डची बरोबरी

या शतकासह शुभमन गिलने ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. हा विक्रम पाकिस्तानच्या बाबर आझमच्या नावावर आहे. बाबरने २०१६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ३ सामन्यात ३६० धावा केल्या होत्या. आता शुभमन गिलनेही न्यूझीलंडविरुद्ध केवळ ३ सामन्यात ३६० धावा केल्या आहेत. बाबरचा रेकॉर्ड मोडायला शुभमनला फक्त १ धाव कमी पडली.

भारताचे न्यूझीलंडला ३८६ धावांचे आव्हान

कर्णधार रोहित शर्मा १०१ धावा, शुभमन गिल ११२ धावा, आणि शेवटच्या काही षटकांमध्ये हार्दिक पांड्याने केलेल्या तुफान फटकेबाजीच्या बळावर टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी ३८६ धावांचं आव्हान ठेवलं आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com