Shubhman Gill: ऐकलं का! १०० रुपयांची पैज अन् टीम इंडियाला सापडला अनमोल हिरा; शुभमन गिलने सांगितला किस्सा

गेल्या काही महिन्यांपासून शुभमन गिलची बॅट चांगलीच तळपताना दिसत आहे.
Shubhman Gill
Shubhman GillSaamtv

Ind Vs NZ T20 Series: न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या आणि निर्णायक सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला. सलामवीर शुभमन गिल या विजयाचा शिल्पकार ठरला. या सामन्यात गिलने वादळी शतकी खेळी गेली.

गेल्या काही महिन्यांपासून शुभमन गिलची बॅट चांगलीच तळपताना दिसत आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये शुभमन गिलच्या नावाची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.

Shubhman Gill
Kasaba By Election : 'कसबा'साठी पक्षांमध्ये रस्सीखेच, इच्छुकांमध्ये अहमहमिका; आता NCP ने वाढवला ट्विस्ट

23 वर्षीय शुभमन गिल सध्या भारतीय क्रिकेटचा नवा स्टार बनला आहे. कसोटी सामना असो वा टी-२० आणि वनडे क्रिकेट, शुभमन गिलच्या बॅटची ताकद सर्वत्र पाहायला मिळत आहे. शुभमन गिलच्या सातत्यपूर्ण धावा आणि उत्तम कामगिरीने भारतीय चाहत्यांच्या आशा उंचावल्या आहेत. त्यामुळे शुभमन गिलबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे.

जबरदस्त फॉर्मची चर्चा..

शुभमन गिलच्या वादळी शतकाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. शुभमन ज्या पद्धतीने शॉट मारतो, मोठे फटके लगावतो त्यावरुन त्याच्या शैलीचे जोरदार कौतुक होत आहे. गिल त्याच्या फॉर्मप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारासोबतच्या प्रकरणाचीही सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Shubhman Gill
WhatsApp Account Banned : एका महिन्यात 36 लाख WhatsApp अकाउंट बंद ! यात तुमचा नंबर तर नाही ना...

१०० रुपयांचा किस्सा...

शुभमन गिलने लहाणपणापासून घेतलेल्या मेहनतीमुळेच तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.पंजाबमधील फाजिल्का येथून आलेला शुभमन गिल सुरुवातीला तिथे क्रिकेट खेळला.त्याच्या वडिलांनी त्याला खूप मदत केली.

शुभमनने स्वतः सांगितले होते की, त्याचे वडील गोलंदाजांना आव्हान देत असत की जो कोणी शुभमनला बाद करेल त्याला 100 रुपयांचे बक्षीस मिळेल. याच १०० रुपयांच्या बक्षिसामुळे शुभमन लहान असतानाही जोरदार फटकेबाजी करायचा. ज्याची झलक आत्ता पाहायला मिळत आहे.

वडिलांना सोडावी लागली शेती..

शुभमन गिलच्या मते, त्याचे कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून होते. पण सगळी शेतं आणि घरं गावातच होती आणि त्याचा सराव चंदिगडमध्ये सुरू होता. मग वडिलांनी मोठा निर्णय घेतला आणि चंदीगडला शिफ्ट झाले. याचा परिणाम शेतीवरही झाला.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही धावांचा पाऊस...

अंडर-19 ते देशांतर्गत क्रिकेटपर्यंत शुभमन गिलने धावांचा पाऊस पाडला आहे, त्याने 40 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 53 च्या सरासरीने 3200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, तसेच 76 लिस्ट-ए सामन्यांमध्ये 54.12 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमक दाखवल्यानंतर शुभमन गिलला टीम इंडियात एंट्री मिळाली, आधी छोट्या मालिकेत संधी मिळाली आणि आता तो टीम इंडियाचा (Team India) स्फोटक सलामवीर बनत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com