
India Vs NZ ODI: न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या तीन एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाने ३-० अशी जबरदस्त विजय साकारला. या विजयासोबतच भारतीय संघाने वनडेमध्ये पहिले स्थानही पटकावले आहे. आधी श्रीलंका आणि आता न्यूझीलंडला जोरदार धूळ चारत भारतीय संघाने आपणच वनडेचा बादशहा असल्याचा इशाराही दिला आहे.
भारतीय संघाच्या या विजयानंतर संघातील दिग्गज खेळाडूंनी या यशाचे गणित नेमके काय होते. याबद्दलचा खुलासा केला आहे. (Indian Cricket Team)
भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्मा, सलामवीर शुभमन गिल अखेरच्या सामन्यात शार्दुल ठाकूर तसेच कुलदिप यादवनेही विजयात महत्वाची भूमिका बजावली. या खेळाडूंनीच या यशाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित शर्मा- शेवटच्या सामन्यात दमदार शतक झळकावत हिरो ठरलेल्या रोहित शर्माने याबद्दल बोलताना सांगितले की, गेल्या 6 एकदिवसीय सामन्यांमध्ये आम्ही अनेक गोष्टी चांगल्या केल्या. बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये आमच्या कामगिरीत सातत्य होते. मात्र नंबर वन रँकिंगच्या प्रश्नावर मी जास्त बोलणार नाही कारण ते आमच्या जिंकण्यावर अवलंबून आहे. (Rohit Sharma)
शुभमन गिल- याबद्दल बोलताना शुभमन गिलने सांगितले की, मालिका जिंकल्यानंतर आणि जागतिक क्रमवारीत अव्वल झाल्यानंतर खूप छान वाटत आहे. माझे लक्ष फक्त चांगल्या सुरुवातीला मोठ्या खेळीत रूपांतर कसे करायचे यावर होते. संपूर्ण मालिकेत मी तेच केलं. मी फक्त परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे फळ मिळाले.
हार्दिक पांड्या - याबद्दल बोलताना हार्दिक पांड्या (Hardik Pandya) म्हणाला की, नवीन चेंडूने गोलंदाजी करणे नेहमीच छान असते. मी त्याला दोन्ही बाजूंनी स्विंग करतो. कामाचा ताण योजनेनुसार आहे. माझे शरीर सध्या मला चांगली साथ देत आहे. आणि मला बरे वाटत आहे.
शार्दुल ठाकूर- जेव्हा विरोधक वर्चस्व गाजवू लागतात तेव्हा त्या क्षणी टिकून राहणे महत्त्वाचे असते. मी जास्त विचार करत नाही. तुम्हाला नेहमी वेगवेगळ्या परिस्थितींसाठी तयार असायला हवे आणि मी त्यानुसार जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. आजच्या क्रिकेटमध्ये फलंदाजी आवश्यक आहे आणि तीच गरज मी अनुभवत आहे.
युझवेंद्र चहल- 'कुलदिपचा' फॉर्म परत आल्याचा मला आनंद आहे. माझ्या भावासोबत (कुलदीप) खूप दिवसांनी गोलंदाजी करताना मजा आली.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.