Ind vs Pak Live Score & Updates: भारताचा पाकिस्तानवर विक्रमी विजय; २२८ धावांच्या फरकाने जिंकला सामना

Ind vs Pak Asia Cup Match 2023 Live News in Marathi: भारत - पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये सुपर ४ चा सामना सुरू आहे.
india vs pakistan, asia cup 2023 live score updates
india vs pakistan, asia cup 2023 live score updatessaam tv

पाकिस्तानला सातवा धक्का; इफ्तिखार अहमद तंबूत परताला

पाकिस्तानला सातवा धक्का बसला आहे. इफ्तिखार अहमद २३ धावांवर बाद झाला.

पाकिस्तानला सहावा धक्का; शादाब खान ६ धावांवर झेलबाद

पाकिस्तानला सहावा धक्का बसला आहे. पाकिस्तानी फलंदाज शादाब खान अवघ्या ६ धावांवर बाद झाला आहे.

पाकिस्तानला पाचवा धक्का; जखमी सलमान तंबूत परतला

पाकिस्तानला पाचवा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा फलंदाज सलमान अली २३ धावांवर बाद झाला आहे.

पाकिस्तानला चौथा धक्का; फखर जमान बाद

पाकिस्तानचा चौथा मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा फखर जमान बाद झाला आहे.

पाकिस्तानला तिसरा धक्का; मोहम्मद रिझवान बाद

पाकिस्तानला तिसरा धक्का बसला आहे. मोहम्मद रिझवान अवघ्या २ धावांवर तंबूत परतला आहे.

पाऊस थांबला! डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला किती धावांचं टार्गेट मिळणार?

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पावसामुळे थांबवण्यात आला आहे. पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार नवीन टार्गेट मिळण्याची शक्यता आहे. नियमानुसार, पाकिस्तानला २० षटकात २००, २२ षटकात २१६, २४ षटकात २३० किंवा २६ षटकात २४४ धावांचं आव्हान मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता पाऊस थांबला आहे. खेळपट्टीवरील कव्हर्स काढण्याचं काम बाकी आहे.

पाऊस थांबला! कव्हर्स काढण्याचं काम सुरू

पाकिस्तानने आतापर्यंत २ गडी बाद ४४ धावांपर्यंत मजल मारली आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पावसामुळे थांबवला; पाकिस्तानने २ गडी गमावले

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पावसामुळे थांबवला आहे. या सामन्यात आतापर्यंत दोन गडी गमावले आहेत.

पाकिस्तानला दुसरा धक्का; कर्णधार बाबर आझम बाद

पाकिस्तानला दुसरा धक्का बसला आहे. कर्णधार बाबर आझम दहा धावांवर बाद झाला आहे.

IND vs PAK: पाकिस्तानचा पहिला धक्का 

इमाम बुमराहच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

पाकिस्तानची सावध सुरूवात 

पाक संघानं एकही विकेट न गमावता १५ धावा केल्या आहेत.

पाकिस्तानसमोर भारताचं ३५७ धावांचं लक्ष्य

राहुल आणि विराट कोहलीनं शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानसमोर धावांचा डोंगर उभारला आहे. राहुलनं नाबाद १११ धावा, तर विराटने १२२ धावा केल्या. भारतानं ३५६ धावा केल्या असून, पाकिस्तानला विजयासाठी ३५७ धावांची गरज आहे.

india vs pakistan, asia cup 2023 live score updates
Ind vs Pak: आधी धो-धो पाऊस, नंतर कोहली-राहुलचा वादळी तडाखा; पाकिस्तानला टीम इंडियाचं 357 धावांचं आव्हान

भारताच्या ४३ षटकांत २८० धावा, राहुल-कोहली मैदानात

राहुल आणि कोहलीच्या दीडशतकी भागीदारीच्या जोरावर भारतानं ४३ षटकांमध्ये २८० धावा केल्या आहेत.

भारताच्या २५० धावा पूर्ण, कोहली-राहुल मैदानात

भारताच्या ३६ षटकांत २ बाद २२९ धावा 

पाकिस्तानविरुद्ध भारताने ३६ षटकांत २२९ धावा केल्या आहेत. राहुल आणि कोहली दोघेही मैदानावर आहेत. राहुलने अर्धशतक झळकावलं आहे, कोहली अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे.

विराट-राहुलने सावरला डाव! शतकी भागीदारी  पूर्ण

या दोघांची १०० धावांची भागीदारी पूर्ण झाली आहे. विराट ३९ तर राहुल ६३ धावांवर नाबाद आहे .

६ महिन्यांनंतर राहुलचं दमदार कमबॅक! 

केएल राहुलने ६० चेंडूंचा सामना करत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे.

राहुल -विराटचा लंकेत कहर! भारताच्या २०० धावा पूर्ण

भारतीय संघाच्या २०० धावा पूर्ण झाल्या आहेत.

सामन्याला सुरूवात होताच पाकिस्तानला मोठा धक्का

या सामन्यात वेगवान गोलंदाज हॅरीस रउफ गोलंदाजी करताना दिसून येणार नाही.

४ वाजून ४० मिनिटांनी सुरू होणार सामना 

भारत- पाक सामन्याला लवकरच होणार सुरूवात

 लंकेत आशेचा किरण!

भारत- पाकिस्तान सामन्यापूर्वी कोलंबोत पावसाची तुफान फटकेबाजी

पून्हा एकदा पावसाच्या सरी बरसल्याने राखीव दिवसाचा खेळ सुरू होऊ शकलेला नाही

 भारत- पाकिस्तान सामन्याला लवकरच होणार सुरुवात

क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पाऊस थांबला असून लवकरच सामन्याला सुरूवात होणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पावसाची बॅटिंग; आता राखीव दिवशी होणार सामना

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पावसाने खोडा घातला आहे. यामुळे आजचा सामना उद्या राखीव दिवशी होणार आहे. टीम इंडियाने आतापर्यंत २४.१ षटकात २ गडी गमावून १४७ धावा कुटल्या आहेत.

भारत- पाकिस्तान सामन्यात पावसाची तुफान बॅटिंग

पावसामुळे खेळ थांबला.. 

या सामन्यात पाऊस येण्याची शक्यता वर्तवली गेली होती. पावसामुळे खेळ थांबला आहे. आतापर्यंत २३.१ षटकांचा खेळ झाला असून भारतीय संघाची धावसंख्या २ गडी बाद १४७ इतकी आहे.

भारताला दुहेरी धक्का! रोहित पाठोपाठ गिलने धरली परतीची वाट

रोहित शर्मा ५६ धावांवर बाद झाल्यानंतर शुबमन गिल ५८ धावा करत माघारी परतला आहे.

  भारताला पहिला धक्का

कर्णधार रोहित शर्मा ५६ धावांवर माघारी परतला आहे.

रोहितचं अर्धशतक पूर्ण..

रोहितने षटकार मारत आपलं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं आहे.

लंकेत भारतीय ओपनर्सचा कहर! शतकी भागीदारी पूर्ण

शुबमन गिल ५२ तर रोहित शर्मा ४४ धावांवर नाबाद आहे.

गिलचं अर्धशतक पूर्ण.. 

शुबमन गिलने ३७ चेंडूंचा सामना करत अर्धशतक पूर्ण केलं आहे.

१० षटकांच्या  समाप्तीनंतर भारतीय संघ मजबूत स्थितीत.. 

१० षटकांच्या  समाप्तीनंतर भारतीय संघाने ६१ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आणि शुबमन गिलची जोडी मैदानावर टिकून आहे.

भारतीय संघाचं सांघिक अर्धशतक पूर्ण.. 

शुबमन गिल ३९ तर रोहित शर्मा १० धावांवर नाबाद आहे.

गिल- रोहितकडून आफ्रिदीची धुलाई 

गेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांना नडणाऱ्या शाहीन आफ्रिदीची रोहित शर्मा आणि शुबमन गिलने चांगलीच धुलाई केली आहे.

 ३ षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघाची धावसंख्या बिनबाद २३ धावा

रोहित शर्मा आणि शुबमन गिलने संघाला आक्रमक सुरूवात करून दिली आहे.

भारताची दमदार सुरुवात

भारतीय कर्णधार रोहित शर्माने शाहीन आफ्रिदीच्या पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर खणखणीत षटकार मारला आहे.

क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

या सामन्यासाठी अशी आहे पाकिस्तानची प्लेइंग ११ 

india vs pakistan, asia cup 2023 live score updates
IND vs PAK, Asia Cup 2023: महामुकाबल्यासाठी पाकिस्तानची प्लेइंग ११ जाहीर! टीम इंडियाला धडकी भरवणाऱ्या गोलंदाजाची एन्ट्री

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११ 

Ind vs Pak 2023 Live Score & Updates:

भारत विरूद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरू आहे. हा सामना कोलंबोच्या मैदानावर सुरू आहे. हे दोन्ही संघ जेव्हा साखळी फेरीतील सामन्यांमध्ये आमने सामने आले होते त्यावेळी सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आता सुपर ४ फेरीतील सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंकडून दमदार खेळीची अपेक्षा असणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com