Ind vs Pak : पाकिस्तानचं काही खरं नाही, टीम इंडियाच्या ६ खेळाडूंनी गाळला घाम; त्यातील दोघे मॅचविनर!

India Vs Pakistan Super 4 match Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेच्या सुपर ४ फेरीत भारत आणि पाकिस्तान १० सप्टेंबरला भिडणार आहेत.
India vs Pakistan Asia Cup 2023/BCCI
India vs Pakistan Asia Cup 2023/BCCISAAM TV

India Vs Pakistan Super 4 match Asia Cup 2023

आशिया चषक २०२३ स्पर्धेच्या सुपर ४ फेरीत भारत आणि पाकिस्तान १० सप्टेंबरला भिडणार आहेत. कोलंबोच्या प्रेमदासा मैदानात हा सामना होतोय. पण हा सामना होईल की नाही हा प्रश्न कायम आहे. कारण कोलंबोत दमदार पाऊस होतोय आणि पुढील काही दिवस पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. पण टीम इंडियाचे धुरंधर थांबले नाहीत. ते मैदानात कसून सराव करताहेत. त्यामुळं सामना झालाच तर पाकिस्तानचं काही खरं नाही, असंच चित्र सध्या तरी दिसतंय. (Latest Marathi News)

भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्यावर सगळ्यांच्या नजरा आहेतच, पण पावसाचं सावट देखील आहे. सामना होईल की नाही ही शंका आहे, तरीही टीम इंडियानं सराव काही थांबवला नाही. काही खेळाडूंनी प्रेमदासा स्टेडियममध्ये इनडोअर प्रॅक्टिस केली. आश्चर्याची बाब म्हणजे या सरावात रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं सहभाग घेतला नाही.

नेपाळच्या विरोधात ४ सप्टेंबरला टीम इंडिया मैदानात उतरली होती. त्यानंतर कोलंबोत पोहोचली होती. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर ७ सप्टेंबरला टीम इंडियानं सराव केला. खेळाडूंना मैदानात सराव करता आला नाही. त्यांनी इनडोअर नेटमध्ये सराव केला. पाऊस पडत असल्यामुळं प्रेमदासा मैदान ओलेचिंब झाले आहे. काही ठिकाणी पाणी भरलं आहे. त्यामुळं खेळाडूंना इनडोअर प्रॅक्टिस करावी लागली.

India vs Pakistan Asia Cup 2023/BCCI
World Cup 2023 : वर्ल्डकपआधी येऊन धडकलं धक्कादायक वृत्त; क्रिकेटच्या कुंभमेळ्यानंतर टीम इंडियात वादळ?

सहा खेळाडूंनी केला सराव

टीम इंडिया सध्या सराव करत असली तरी, सराव सत्रात केवळ ६ खेळाडूंनी सहभाग घेतला. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि वेगवान गोलंदाजांसह अनेक खेळाडूंनी सरावात भाग घेतला नाही. खेळाडूंना हे सराव सत्र ऐच्छिक होते. आता ते पुढच्या सराव सत्रात सहभागी होतील. या सत्रात केएल राहुल, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर आणि सूर्यकुमार यादव यांनी भाग घेतला होता.

India vs Pakistan Asia Cup 2023/BCCI
World Cup 2023: वर्ल्डकप स्पर्धेआधीच क्रिकेटप्रेमींना BCCI ने दिली मोठी भेट, ४ लाख तिकीटं विकणार, कशी घ्याल?

राहुल आला, पाकिस्तानविरुद्ध संधी मिळेल का?

टीम इंडियाच्या सराव सत्रात केएल राहुल सहभागी झाला होता. तो पूर्णपणे फिट होऊन टीम इंडियात परतला आहे. राहुल दुखापतीमुळं ४ महिने मैदानापासून दूर राहिला होता. आता पहिल्यांदाच तो मैदानात दिसतोय.

आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्या दोन सामन्यांत त्याचा समावेश नव्हता. पण आता तो श्रीलंकेत पोहोचलाय आणि सराव सत्रातही भाग घेतला. त्याला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संधी मिळणार का? हाच खरा प्रश्न आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com