IND VS SA T 20: तिकीटांसाठी उडाली झुंबड, पोलिसांचा क्रिकेटप्रेमींवर लाठीमार; काय घडलं वाचा!

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा टी-२० सामना कटक येथे होणार आहे.
IND VS SA T 20: तिकीटांसाठी उडाली झुंबड, पोलिसांचा क्रिकेटप्रेमींवर लाठीमार; काय घडलं वाचा!
Ind Vs SA 2nd T20 Match in Cuttack News Latest UpdateSAAM TV

मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताला धावांचा डोंगर उभारूनही पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने ७ विकेटने भारताला पराभूत केलं. आता टीम इंडिया (Team India) दुसऱ्या टी-२० सामन्यात पराभवाचा वचपा काढून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. दुसरी लढत ही कटकमध्ये होणार आहे. (India Vs South Africa T20)

Ind Vs SA 2nd T20 Match in Cuttack News Latest Update
भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजमध्ये कोरोनाचा शिरकाव, आफ्रिकेचा 'हा' स्टार खेळाडू पॉझिटिव्ह

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) या दोन संघांत टी-२० मालिका (T-20 Series) सुरू आहे. भारतानं पहिला सामना गमावला आहे. आता दुसरा सामना कटकमध्ये होणार आहे. त्यापूर्वी एक वृत्त समोर येत आहे.

दुसऱ्या सामन्याच्या तिकीट विक्रीवेळी गोंधळ बघायला मिळाला. तिकीट खरेदीसाठी क्रिकेटप्रेमींनी (Cricket) तुफान गर्दी केली होती. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, काही महिला क्रिकेटप्रेमी रांग मोडून पुढे आल्या. त्यामुळे काही वेळ गोंधळ उडाला. अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, काही महिला क्रिकेटप्रेमी रांग मोडून पुढे आल्या. गर्दीतील काही जणांनी आक्षेप घेतला. त्यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. त्यांनी सौम्य लाठीमार केल्याचे कळते.

Ind Vs SA 2nd T20 Match in Cuttack News Latest Update
रिषभ पंत टीम इंडियाचा कर्णधार; गर्लफ्रेंड झाली खूश, इन्स्टाग्रामवर शेअर केला जबरदस्त मेसेज

पोलिसांनी सांगितले की, जवळपास ४० हजार जण काउंटरवर उपस्थित होते. तर अवघ्या १२ हजार तिकीटांची विक्री होणार होती. त्यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला. पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. तिकीट विक्री सुरळीत व्हावी यासाठी पोलिसांना ही कारवाई करावी लागली.

पहिल्या सामन्यात भारताचा पराभव

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर २१२ धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. दक्षिण आफ्रिकेनं हे आव्हान पाच चेंडू शिल्लक ठेवून पार केलं. दक्षिण आफ्रिकेकडून डेविड मिलरनं आपला आयपीएलमधील फॉर्म कायम ठेवताना तुफान फलंदाजी करून संघाला विजय मिळवून दिला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com