Ind vs SA T 20 : टीम इंडियामध्ये कुणाला संधी? तिसरा सामना गमावला तर...

तिसऱ्या टी-२० लढतीत प्लेइंग इलेव्हन कशी असेल? कुणाला मिळणार संधी?
India vs South Africa 3rd T 20 Match Latest Update (Twitter/BCCI)
India vs South Africa 3rd T 20 Match Latest Update (Twitter/BCCI)SAAM TV

मुंबई/विशाखापट्टणम: दक्षिण आफ्रिका विरुद्धचे सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर टीम इंडियाला (Team India) कोणत्याही परिस्थितीत तिसरा सामना जिंकावा लागणार आहे. रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज, मंगळवारी तिसरा सामना विशाखापट्टणम येथे होत आहे. हा सामना भारतानं जिंकला नाही तर, ही मालिकाही गमवावी लागणार आहे. (India vs South Africa T20 series)

India vs South Africa 3rd T 20 Match Latest Update (Twitter/BCCI)
IPL 2022: IPL तो झांकी है, टीम इंडिया बाकी है; DK चा व्हिडिओ व्हायरल

अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत मैदानात उतरलेल्या टीम इंडियासमोर या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. मात्र, संघासमोर अनेक समस्या आहेत. फिरकीपटू फॉर्ममध्ये नाहीत. तर सलामीवीरांच्या फलंदाजीत सातत्य नाही. तर वेगवान गोलंदाजांना पॉवर प्लेमध्ये विकेट मिळत नाहीत. तर कर्णधार रिषभ पंतच्या (Rishabh Pant) बॅटमधून धावा निघत नाहीत.

पहिल्या लढतीत भारताकडून खराब गोलंदाजी झाली. तर दुसऱ्या लढतीत भारतीय फलंदाजांनी निराशा केली. भारतीय सलामीवीर अद्याप पॉवरप्लेमध्ये संघाला चांगली सुरुवात करून देऊ शकले नाहीत. इशान किशनने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. मात्र, ऋतुराज गायकवाड यानं दोन लढतीत केवळ २४ धावा केल्या आहेत.

India vs South Africa 3rd T 20 Match Latest Update (Twitter/BCCI)
रिषभ पंत टीम इंडियाचा कर्णधार; गर्लफ्रेंड झाली खूश, इन्स्टाग्रामवर शेअर केला जबरदस्त मेसेज

कर्णधार रिषभ पंतची बॅट शांतच

के. एल. राहुल जखमी झाल्याने कर्णधार म्हणून रिषभ पंतकडे जबाबदारी दिली आहे. मात्र, कर्णधारपदाला साजेशी कामगिरी त्याच्याकडून झालेली नाही. पंतने आतापर्यंत या मालिकेत अनुक्रमे २९ आणि पाच धावा केल्या आहेत. त्याने ४५ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत २३.९ च्या सरासरीने केवळ तीन अर्धशतके केली आहेत. तसेच पंतने आतापर्यंतच्या घेतलेल्या निर्णयांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. (T20 Cricket)

भारतीय संघ -

रिषभ पंत (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक

दक्षिण आफ्रिका संघ- तेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), रिजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी, एनरिक नॉर्किया, वायने पर्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्ज, रासी वान डेर डुसेन, मार्को यानसन.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com