
बंगळुरु : भारत आणि दक्षिण आफ्रिकेत पाच टी-२० सामन्यांची मालिका (India vs South Africa) सुरू आहे. आफ्रिकेने सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताचा दारुण पराभव केला होता. परंतु, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रिषभ पंतने (Rishabh Pant) क्रिकेटच्या मैदानात जबरदस्त रणनीती आखून मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यामध्ये विजयाचा गुलाल उधळला. भारताचा संघ या सीरिजमध्ये २-१ ने पिछाडीवर होता. पण १७ जूनला झालेल्या भारत आणि आफ्रिकेच्या लढतीत आवेश खान (Aveshh Khan) आणि दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) चमकदार कामगिरी केली. त्यामुळे भारताने आफ्रिकेला पुन्हा एकदा पराभूत करुन मालिकेत २-२ अशी बरोबरी केलीय.
दरम्यान, आज बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये या सीरिजचा अंतिम मुकाबला होणार आहे. टीम इंडियात नवोदीत खेळाडूंना अधिक प्राधान्य देण्यापेक्षा अनुभवी गोलंदाजांना संधी दिली जात आहे. सुरुवातीचे सामने वगळता इतर सामन्यांमध्ये गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. परंतु, टॉप ऑर्डरचे फंलदाज ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि कर्णधार रिषभ पंतला (Rishabh Pant) मागील दोन सामन्यांमध्ये सूर गवसलेला नाही. तर दुसरीकेड मिडल ऑर्डरमध्ये येणारा हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिकने आफ्रिकेच्या फलंदाजांचा धुव्वा उडवला. हार्दिक-दिनेशची जोडी कमालीची फॉर्ममध्ये आहे.
नुकत्याच झालेल्या आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिकने आक्रमक खेळी करुन अर्धशतक ठोकले. तर पंड्याचं अर्थशतक थोडक्यात चुकलं. विशेष म्हणजे भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी गोलंदाज आवेश खानवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरला. आफ्रिके विरुद्ध झालेल्या चौथ्या सामन्यात आवेशने महत्वाच्या फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनीही आजचा अंतिम सामना जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन आणि रासी वॅन डर डुसेन यांनी आफ्रिकेच्या धावफलकाची कमान सांभाळली आहे. त्यामुळे या आक्रमक फलंदाजांना रोखण्याचे भारतीय गोलंदाजांपुढे मोठं आव्हान असणार आहे.
संभाव्य प्लेईंग ईलेव्हन
भारत : ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (कर्णधार आणि विकेटकिपर ), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्शल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान.
दक्षिण आफ्रिका : टेम्बा बवुमा (कर्णधार ), क्विंटन डि कॉक (विकेट किपर), ड्वेन प्रिटोरियस, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, रासी वॅन डर डुसेन, मार्को जॅनसन, तबरेझ शामसी, केशव महाराज, एनरिच नोर्तजे, लुंगी निगडी
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.