
आशिया चषक २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना नुकताच पार पडला. भारत विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ केला. अवघ्या ५१ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने १० गडी राखून विजय मिळवला.
यासह आठव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. दरम्यान या विजयानंतर भारतीय संघावर बक्षीस स्वरूपात पैशांचा वर्षाव करण्यात आला आहे.
भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना एकट्या मोहम्मद सिराजने ६ गडी बाद केले. त्यामुळे श्रीलंकेचा डाव अवघ्या ५० धावांवर संपुष्टात आला. हे आव्हान भारतीय संघाने ६.१ षटकात पूर्ण केले. विजेत्या भारतीय संघाला बक्षीस म्हणून १,५०,००० युएस डॉलर्स इतकी रक्कम मिळाली आहे. तर उपविजेत्या श्रीलंकेला ७५,००० युएस डॉलर्स इतकी रक्कम मिळाली आहे.
कुलदीपने पटकावला मालिकावीर पुरस्कार..
आशिया चषकात फिरकीपटू कुलदीप यादवने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात ५ गडी तर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ४ गडी बाद केले होते. या दमदार कामगिरीच्या बळावर त्याची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याला १५,००० युएस डॉलर्स इतकी रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली आहे. (Latest sports updates)
अंतिम सामन्यात ६ गडी बाद करणाऱ्या मोहम्मद सिराजची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. या सामन्यात त्याने एकाच षटकात ५ गडी बाद करण्याचा कारनामा करून दाखवला आहे.
दरम्यान त्याला ५,००० युएस डॉलर्स इतकी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे. ही रक्कम त्याने ग्राउंड्समनला देण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र श्रीलंकेचा संपूर्ण डाव अवघ्या ५० धावांवर संपुष्टात आला. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ६.१ षटकात आव्हान पूर्ण करत विजय मिळवला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.