Asia Cup 2023 Final: आशिया चषकाच्या फायनलमध्ये टीम इंडियाची चिंता वाढवणारी आकडेवारी; हा रेकॉर्ड कोणालाच नाही जमला

India vs Srilanka, Asia Cup 2023 Final: आशिया चषकातील अंतिम सामन्यात भारतीय
Team India
Team India Saam Tv

India vs Srilanka, Asia Cup 2023 Final Team India Record:

आशिया चषक २०२३ स्पर्धेत भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. भारीय संघाने सुपर ४ फेरीत पाकिस्तान आणि श्रीलंकेला धुळ चारत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे. पाकिस्तानला धुळ चारत श्रीलंकेने देखील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

आता हे दोन्ही संघ १७ सप्टेंबर रोजी आशिया चषकाचा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहेत. दरम्यान या सामन्यापुर्वी जाणून घ्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यातील काही खास रेकॉर्ड्स.

Team India
Ind vs SL, Asia Cup Final: केव्हा,कुठे अन् कधी रंगणार भारत- श्रीलंका अंतिम सामना? जाणून घ्या एकाच क्लिकवर

अंतिम सामन्यात एकही शतक नाही..

आशिया चषकात सर्वाधिक जेतेपदं पटकावण्याचा रेकॉर्ड हा भारतीय संघाच्या नावे आहे. मात्र अंतिम सामना खेळताना भारतीय संघातील एकाही फलंदाजाला शतक झळकावता आलेलं नाही.

सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि एमएस धोनी यांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केलं आहे. मात्र कुठलाही फलंदाज शतक पूर्ण करू शकला नाही.

यंदा हा रेकॉर्ड मोडला जाणार..

भारतीय संघात एकापेक्षा एक धडाकेबाज फलंदाज आहेत,जे सध्या जोरदार फॉर्ममध्ये देखील आहेत. यंदा रोहित शर्मा,शुबमन गिल, विराट कोहली आणि केएल राहुलसारखे फलंदाज हा रेकॉर्ड मोडून काढू शकतात.

जर यापैकी कुठल्याही फलंदाजाने अंतिम फेरीत शतक झळकावले तर हे भारतीय संघाकडून आशिया चषकाच्या अंतिम फेरीत झळकावलेलं पहिलंच शतक असेल. (Latest sports updates)

भारतीय संघाच्या नावे सर्वाधिक जेतेपदं जिंकण्याची नोंद..

आशिया चषक स्पर्धेचा आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहिला तर भारतीय संघाने सर्वाधिक ७ वेळेस जेतेपदं पटकावली आहेत.

भारतीय संघाने १९८४, १९८८,१९९०/९१, १९९५,२०१०,२०१६ आणि २०१८ मध्ये हा कारनामा करून दाखवला आहे. तर श्रीलंकेचा रेकॉर्ड पाहिला तर ,या संघाने १९८६,१९९७,२००४,२००८,२०१४ आणि २०२२ मध्ये जेतेपदाला गवसणी घातली आहे. २००० आणि २०१२ मध्ये झालेल्या स्पर्धेत पाकिस्तानला जेतेपदाचा मान मिळाला होता.

Team India
IND vs SL, Weather Update: भारत - श्रीलंका सामन्यावर पावसाचे सावट! सामना रद्द झाल्यास कसा लावला जाईल निकाल?

भारतीय संघ दहाव्यांदा खेळणार आशिया चषकाचा अंतिम सामना..

भारतीय संघ दहाव्यांदा आशिया चषकाचा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. आतापर्यंत खेळलेल्या ९ अंतिम सामन्यांमध्ये भारतीय संघाने ६ वेळेस बाजी मारली आहे. ९ पैकी ८ सामन्यांमध्ये भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. तर १ वेळेस भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये आशिया चषकाचा अंतिम सामना रंगला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com