Ind vs SL ODI Series: उद्यापासून भारत- श्रीलंका ODI मालिका रंगणार, कोणाचे पारडे जड? पहा संपूर्ण वेळापत्रक...

श्रीलंकेला टी ट्वेंटी मालिकेत धुळ चारल्यानंतर भारतीय संघ एकदिवसीय मालिकाही खिशात घालण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे.
ind vs sl odi Siries
ind vs sl odi SiriesSAAM TV

Ind vs Srilanka T20 Siries: श्रीलंकेला टी ट्वेंटी मालिकेत धुळ चारल्यानंतर भारतीय संघ एकदिवसीय मालिकाही खिशात घालण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. ज्यामधील पहिला सामना १० जानेवारीला रंगणार आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळल्या जाणाऱ्या या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ गुवाहाटीला दाखल झाला आहे. पाहूया या सामन्याचे संपूर्ण वेळापत्रक.

ind vs sl odi Siries
Ind vs SL ODI Siries: श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सिरीजमधून जसप्रीत बुमराह OUT; सहाच दिवसात BCCI ने बदलला निर्णय

भारत आणि श्रीलंका (Srilanka ) यांच्यामधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून सुरूवात होत आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ गुवाहाटीमध्ये दाखल झाला आहे. त्याचबरोबर टी ट्वेंटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आलेले रोहित शर्मा आणि विराट कोहलीही या मालिकेत खेळणार आहेत.

कोणाचे पारडे जड?

भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आत्तापर्यंत १६२ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. ज्यामधील ९३ सामने भारतीय संघाने जिंकले आहेत तर श्रीलंका संघाने ५७ सामने जिंकले आहेत. दोन्ही संघात खेळले गेलेले उर्वरित ११ सामने अनिर्णित राहिले आहेत.

कधी होणार सामने?

भारत आणि श्रीलंका यांच्यामधील पहिला एकदिवसीय सामना १० जानेवारीला गुवाहाटीमध्ये रंगणार आहे. त्यानंतर दुसरा एकदिवसीय सामना १२ जानेवारीला कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर होणार आहे. तर मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना १५ जानेवारीला तिरुवनंतपुरम येथे होणार आहे. हे तीनही सामने दुपारी 1.30 ला सुरू होणार आहेत.

ind vs sl odi Siries
Nashik Bus Accident: देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या बसला अपघात; 13 जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

कुठे पाहाल सामने?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिका स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर प्रसारित केली जाईल. तमिळ, बांगला यांसारख्या प्रादेशिक भाषांमध्येही हे प्रक्षेपण होईल. त्याच वेळी, डिस्ने प्लस हॉटस्टार आणि त्याच्या वेबसाइटवर या तिन्ही सामन्यांचे थेट प्रसारण देखील केले जाईल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील हे तीन सामने डीडी स्पोर्ट्स (फ्री टू एअर) वर थेट पाहता येतील.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेवन....

टीम इंडिया (Indian Cricket Team) : रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), विराट कोहली, शुभमन गिल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि जसप्रीत बुमराह.

श्रीलंका : दासुन शनाका (कर्णधार), नुवानिडू फर्नांडो, अविष्का फर्नांडो, अशेन बंडारा, पाथुम निसांका, धनंजय डिसिल्वा, चरित अस्लंका, चमिका करुणारत्ने, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदिरा समरविक्रमा (विकेटकीपर), प्रमोदकान, प्रमोदकांका, प्रमोदकाश (विकेटकीपर). ड्युनिथ वेलागे, जेफ्री वांडरसे, कसून रजिथा, लाहिरू कुमारा आणि महिश तिक्ष्णा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com