Ind Vs SL T20 Siries: लंकादहन केल्यानंतर टीम इंडिया जोमात! मालिका पण खिशात अन् 'हे' आठ रेकॉर्डही केले नावावर

भारताने ही मालिका तर जिंकलीच त्याचसोबत आठ मोठे रेकॉर्डही केले.
IND vs SL T20 Match
IND vs SL T20 Match Saam Tv

Ind vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा टी ट्वेंटी सामना जिंकत भारतीय संघाने अगदी आरामात मालिका खिशात घातली. सुर्यकुमार यादवच्या वादळी शतकाच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेसमोर २२८ धावांचा डोंगर उभा केला. पहिल्यापासून सामन्यावर पकड मजबूत ठेवत टीम इंडियाने ९१ धावांनी विजय मिळवला. भारताने ही मालिका तर जिंकलीच त्याचसोबत आठ मोठे रेकॉर्डही केले. पाहूया श्रीलंका विजयानंतर टीम इंडियाने कोणते मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केलेत.

IND vs SL T20 Match
Yash Birthday: फक्त 300 रुपये घेवून घर सोडलेला पोरगा, ते एका चित्रपटाचे 30 कोटी मानधन, रॉकी भाईचा थक्क करणारा प्रवास

1. या मालिका विजयानंतर भारतीय संघाने पाचव्यांदा श्रीलंकेला (Srilanka) मायभूमीत टी ट्वेंटी मालिकेत हरवण्याचा विक्रम केला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात आत्तापर्यंत ६ टी ट्वेंटी मालिका झाल्या. ज्यामध्ये फक्त २००९ मध्ये झालेली मालिका बरोबरीत सुटली होती. म्हणजेच आजपर्यंत एकही मालिका भारत हरलेला नाही.

2. दुसरा विक्रम म्हणजे भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आत्तापर्यंत सर्वच फॉरमॅटमध्ये २५ मालिका खेळल्या गेल्या आहेत. ज्यामध्ये एकाही मालिकेत श्रीलंकेला विजय मिळवता आला नाही. म्हणजेच भारत हा एकमेव देश आहे, ज्यांच्याविरुद्ध श्रीलंकेला अद्याप मालिका विजयी होता आले नाही.

3. भारतीय संघाने २०१९ पासून आत्तापर्यंत एकही मालिका मायदेशात गमावली नाही. मायदेशात खेळल्या गेलेल्या १२ मालिकांमध्ये टीम इंडियाने १० जिंकल्या आहेत, तर दोन मालिका अनिर्णित राहिल्या आहेत.

IND vs SL T20 Match
Raj Thackeray: 'सध्या कोणीही उठतो अन् इतिहासकार होतो' पुण्यात राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी, राजकीय नेत्यांना दिला 'हा' मोलाचा सल्ला

4. भारताने श्रीलंकेविरुद्ध चौथ्यांदा टी-20 मध्ये एका डावात 200 हून अधिक धावा केल्या. यापूर्वी केवळ इंग्लंडविरुद्धच भारताने 4 वेळा 200 हून अधिक धावा केल्या होत्या.

5. इतकेच नाही तर घरच्या मैदानावर भारताचा हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. घरच्या मैदानावर भारताचा सर्वात मोठा विजय 93 धावांनी आहे आणि योगायोगाने तो श्रीलंकेविरुद्धही (2017) होता.

6. तिसरा विक्रम या सामन्यात शतक झळकावणाऱ्या सूर्यकुमारच्या (Suryakumar Yadav) नावावर आहे. रोहित शर्मा नंतर सूर्यकुमार हा दुसरा भारतीय खेळाडू आहे, ज्याने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन शतके झळकावली आहेत.

7. सूर्याने अवघ्या 45 चेंडूत आपले शतक पूर्ण केले, जे भारतासाठी रोहित शर्मा (35 चेंडू) नंतरचे दुसरे सर्वात जलद शतक आहे.

8. या डावात सूर्याने 1500 धावा पूर्ण केल्या, ज्यासाठी त्याने केवळ 843 चेंडू घेतले. अशाप्रकारे, तो सर्वात कमी चेंडूंमध्ये 1500 T20 आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज ठरला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com