Ind Vs SL:बाबो! भारतीय फलंदाजाने थेट अंपायरलाच घातल्या शिव्या; BCCI करणार कारवाई? नेमकं काय घडलं, पाहा Viral Video

या सामन्यात भारतीय फलंदाजाने अंपायरला शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
IND vs SL 1st T20
IND vs SL 1st T20 Saam Tv

Ind Vs Srilanka T20 Siries: श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक मिळवला. या विजयानंतर भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. सामन्यात महत्वाच्या क्षणी दीपक हुड्डा आणि अक्षर पटेलच्या जोडीने फटकेबाजी करत टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. हेच भारतीय संघाच्या विजयाचे शिल्पकारही ठरले.

मात्र या सामन्यात भारतीय फलंदाज दीपक हुड्डाने अंपायरला शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

IND vs SL 1st T20
Ind Vs SL: Umran Malik चा 155Kph च्या स्पीडने आग ओकणारा चेंडू अन् श्रीलंकन कर्णधाराची उडाली भंबेरी, पाहा Video

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात फलंदाजी करताना दीपक हुड्डाने अंपायरला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या सगळा प्रकार सामन्यांच्या १८ व्या ओव्हरमधील ५ व्या चेंडूवर घडला. यावेळी दीपक हुड्डा फलंदाजी करत होता.

यावेळी श्रीलंकेकडून (Srilanka) कसून राजिथा गोलंदाजी करत होता. त्याने ५ वा चेंडू टाकला, तो चेंडू वाईड समजून हुड्डाने सोडून दिला. त्याला अंपायर हा चेंडू वाईड देईल, असे वाटले होते, परंतु अंपायरने तो चेंडू वाईड दिला नाही. त्यानंतर हुड्डाचा पारा चढला, आणि त्याने अंपायरला शिव्या घातल्या. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

IND vs SL 1st T20
Anil Parab: ईडीची मोठी कारवाई! अनिल परब यांची 'इतक्या' कोटींची मालमत्ता जप्त; सोमय्यांनी दिली तिखट प्रतिक्रिया

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून बीसीसीआय (BCCI) हुड्डावर कारवाई करणार का याकडे लक्ष लागले आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने १६१ धावा केल्या तर श्रीलंकेचा संघ १६० धावा करु शकला. यामुळेच भारतीय संघाने हा सामना दोन धावांनी जिंकला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com