
मुंबई: भारत आणि वेस्ट इंडीज (Ind Vs WI) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात भारतानं अगदी सहज विजय मिळवला. मात्र, भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे कर्णधार रोहित शर्मा हा या सामन्यावेळी जायबंदी झाला. फक्त ५ चेंडू खेळून तो मैदानाबाहेर गेला. त्याच्या पाठीच्या मांसपेशी ताणल्या गेल्याने त्याला मैदानाबाहेर जावे लागले. या सामन्यानंतर रोहित शर्माबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. (Rohit Sharma Injury Update News)
रोहित शर्मा म्हणाला की, मी ठीक आहे. आमच्या पुढच्या सामन्याला बराच अवधी आहे. तोपर्यंत मी पूर्णपणे फिट होईल अशी आशा आहे.
भारत आणि वेस्ट इंडीज (India Vs West Indies) यांच्यात मंगळवारी लढत झाली. यात भारताने विजय मिळवला. रोहित शर्माने सलामीला येत चांगली सुरुवातही केली. ५ चेंडूंवर त्याने ११ धावा केल्या. या छोट्याशा डावात त्याने एक चौकार आणि एक षटकार लगावला होता.
वेस्ट इंडीजविरुद्ध भारतीय संघाने (Team India) विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघासमोर वेस्ट इंडीजनं १६५ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. सूर्यकुमार यादवने ४४ चेंडूंत ७६ धावांची तुफानी खेळी केली. त्या जोरावर भारतीय संघाने ७ विकेटने हा सामना जिंकला.
या सामन्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, आम्ही लक्ष्याचा पाठलाग अगदी सहज केला. आपल्या फलंदाजांनी कोणतीही जोखीम न घेता हा सामना सहज जिंकला. सूर्यकुमारने श्रेयस अय्यरसोबत चांगली भागीदारी रचली. जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या लक्ष्याचा पाठलाग करता त्यावेळी काहीही होऊ शकलं असतं. पीचमुळे गोलंदाजांना चांगली मदत मिळत होती. अशावेळी हे आव्हान सोपे नव्हते.
टीम इंडियाची २-१ ने आघाडी
भारतीय संघाने ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने या मालिकेचा पहिला सामना एकतर्फी जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. आता तिसरा सामना जिंकून टीम इंडियाने या मालिकेत आघाडी घेतली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.