७ मॅचमध्ये ठोकली ६ शतके, कुटुंब सोडून प्रशिक्षकाच्या घरी राहिला; आता टीम इंडियात संधी

सुंदर संघातून बाहेर गेला असला तरी, त्याच्या जागेवर एका विस्फोटक फलंदाजाला संधी मिळाली आहे. वॉशिंग्टन सुंदरची जागा आता शाहबाज अहमद हा घेणार आहे. तो झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे.
shahbaz ahmed news
shahbaz ahmed newstwitter

मुंबई: झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेआधीच टीम इंडियाला (India) मोठा झटका मिळाला होता. ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदर हा जायबंदी झाल्यानं मालिकेतून बाहेर व्हावं लागलं. सुंदर संघातून बाहेर गेला असला तरी, त्याच्या जागेवर एका विस्फोटक फलंदाजाला संधी मिळाली आहे. वॉशिंग्टन सुंदरची जागा आता शाहबाज अहमद हा घेणार आहे. तो झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. (shahbaz ahmed news)

shahbaz ahmed news
FIFA चा भारताला मोठा धक्का; भारतीय फुटबॉल फेडरेशनचे निलंबन

झिम्बाब्वेविरुद्ध भारत तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. १८ ऑगस्टपासून हरारेमध्ये होणाऱ्या सामन्यापासून या मालिकेला सुरुवात होत आहे. शाहबाज अहमद याची टी-२० स्पेशालिस्ट अशी ओळख आहे. पण शाहबाज हा वनडेमध्येही जबरदस्त कामगिरी करतो. गोलंदाजी, फलंदाजी अन् क्षेत्ररक्षणातही त्याची कामगिरी उजवी आहे. त्या जोरावर तो सामन्याला कलाटणी देऊ शकतो.

शाहबाज हा हरयाणाच्या मेवात जिल्ह्यातून पश्चिम बंगालमध्ये कसा पोहोचला याची स्टोरीही रंजक आहे. शाहबाजचे वडील त्याला इंजिनीअर करणार होते. त्यांची तशी इच्छा होती. वडिलांनी एका खासगी कॉलेजमध्ये अॅडमिशनही घेऊन दिले. तीन वर्षे शाहबाजने शिक्षण घेतले. मात्र, त्याचं मन क्रिकेटमध्येच रमत होतं.

त्यामुळे तुला क्रिकेट खेळायचं आहे की शिकायचंय अशी विचारणा वडिलांनी केली. त्यावर त्याने क्रिकेटची निवड केली. गुरुग्रामच्या क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेणारा हा खेळाडू आपला मित्र प्रमोद चंदीलाच्या सांगण्यावरून गुरुग्राममध्ये गेला. शाहबाज अहमद हा तपन मेमोरियल क्लबशी जोडला गेला. पहिल्याच सात सामन्यांमध्ये त्याने सहा शतके कुटली. त्याचबरोबर गोलंदाजीतही चमकदार कामगिरी केली. त्यामुळे शाहबाजचं नाव पश्चिम बंगालशी जोडलं गेलं. त्याचं प्रथम श्रेणी प्रकारातही पदार्पण झालं.

shahbaz ahmed news
Ravindra Jadeja Update| रवींद्र जडेजा CSK सोडणार? नेमका काय झाला होता वाद?

शाहबाजचं करिअर घडण्यामागे त्याचे प्रशिक्षक पार्थो प्रतिम चौधरींचा मोठा वाटा आहे. पार्थो यांनी कठीण काळात शाहबाजला मदत केली. शाहबाज हा त्यांच्याच घरी राहत होता. पार्थो यांनी शाहबाजला आपला तिसरा मुलगा मानलं. प्रशिक्षकानं घेतलेली मेहनत फळाला आली. शाहबाजला २०२० मध्ये आयपीएलमध्ये संधी मिळाली. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने शाहबाजला २० लाख रुपयांमध्ये संघात घेतले. मात्र, या खेळाडूला केवळ दोन सामने खेळण्याची संधी मिळाली. २०२१ आणि २०२२ मध्ये शाहबाजला बेंगळुरूने जास्त वेळा संधी दिली. त्यात त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवलं.

शाहबाज अहमद याने बंगालसाठी खेळताना प्रथम श्रेणी सामन्यांत १८ सामन्यांमध्ये ४१ हून अधिकच्या सरासरीने १०४१ धावा केल्या आहेत. त्याशिवाय त्याने ५७ विकेटही घेतल्या आहेत. या खेळाडूमध्ये प्रचंड क्षमता आहे. जर झिम्बाब्वेमध्ये शाहबाजचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालं तर आश्चर्य वाटायला नको.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com