
बर्मिंगहॅम : बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये (common wealth games 2022) पाचव्या दिवशी भारतीय (india) खेळाडूंनी उज्जवल कामगिरी करीत आत्तापर्यंत एकूण तेरा पदकांची (medal) कमाई केली आहे. लाॅन बाॅल्स (lawn bowls) क्रीडा (sports) प्रकारात सुवर्ण (gold medal) यश मिळविल्यानंतर देशाच्या बॅडमिंटनपटूंनी (badminton news) राेमहर्षक खेळ करीत मिश्र सांघिक प्रकारात राैप्य पदक (silver medal) पटकाविले. (Common wealth games 2022 latest marathi news)
बॅडमिंटनमधील गाेल्ड मेडलच्या सामन्यात मलेशियाकडून भारतास (3-1) असा पराभवाचा धक्का बसला. परिणामी भारताच्या खात्यात रौप्य पदक आलं. बॅडमिंटनपटूंच्या यशानंतर देशाची एकूण पदक संख्या तेरा पर्यंत पाेहचली.
पुरूष दुहेरीत मलेशियाने भारतावर (1- 0) अशी आघाडी घेत वर्चस्व सिद्ध केलं. त्यानंतर पी व्ही सिंधूनं (P.V. Sindhu) एकेरीचा सामना जिंकल्याने (1 -1) अशी बरोबरी साधताच भारतीय क्रीडाप्रेमींनी जल्लाेष केला. पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीत जीन वे गोचा (22-20, 21-17) असा पराभव केला.
पुरूष एकेरीत मात्र किदंबी श्रीकांतचा (kidambi srikanth) (21-19, 6-21, 21-16) असा पराभव झाला. यामुळं भारतीय बॅडमिंटनपटूंना धक्का बसला. परिणामी मलेशिया आघाडीवर (2-1) गेली.
महिला दुहेरीत मलेशियाच्या काँग ली पेअरली टॅन आणि मुलरीथर थिन्नाहने भारताची जोडी ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा पहिल्या गेममध्ये (21- 18) असा पराभव केला. दुसऱ्या गेममध्ये जॉली आणि गोपीचंद यांनी कडवी झुंज दिली. त्यांनी सामना (8- 8) असा बरोबरीत आणला. मात्र त्यानंतर मलेशियाच्या जोडीने जोरदार मुसंडी मारत सात गुणांची आघाडी घेतली. त्यानंतर पुन्हा भारताच्या जॉली आणि गोपीचंद जोडीने सामना (17-18) असा जवळ आणला. मात्र मलेशियाच्या मुलींनी सामना (21-17) असा जिंकत सुवर्ण पदकावर नाव कोरले.
साेनं करु शकलाे : पी.व्ही.सिंधू
या सामन्यानंतर सिंधूनं माध्यमांशी संवाद साधताना मलेशिया बराेबर खेळणं तेवढं सोपं नव्हतं. आम्ही अंतिम फेरीत खेळत होतो, त्यामुळे प्रत्येक सामना महत्त्वाचा होता. एक संघ म्हणून, प्रत्येकाने उत्तम खेळ खेळला, मी देखील एक गुण दिला. माझी टीम, मी आनंदी होतो पण दुर्दैवाने, आम्ही त्याचे सोने करू शकलो नाही अशी खंत देखील सिंधूनं व्यक्त केली. एकंदरीत, हे फक्त त्या दिवसावर अवलंबून आहे आणि तो आमचा दिवस नव्हता, हेच मला वाटते. मी आनंदी असले तरी आता पुन्हा बळकट होणे महत्त्वाचे आहे असंही सिंधूनं नमूद केले.
पंतप्रधानांनी केले अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र माेदींनी भारतीय बॅडमिंटनपटूंच्या यशाबद्दल ट्विट करुन अभिनंदन केले आहे. बॅडमिंटनपटूंनी मिळविलेल्या विजयामुळं या खेळाची देशात लाेकप्रियता वाढत राहील. अधिकाधिक खेळाडू या खेळात प्राविण्य मिळवतील अशी आशा माेदींनी व्यक्त केली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.