CWG 2022 : ऐतिहासिक विजय! महिला संघाने लॉन बॉल्स स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच पटकावले सुवर्णपदक

बर्मिंघममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने चौथे सुवर्णपदक जिंकलं आहे. भारताच्या महिला संघाने लॉन बॉल खेळाच्या फायनल इव्हेंटमध्ये दक्षिण अफ्रिकेच्या संघाला १७-१९ ने मात दिली आहे.
india win gold in Lawn Bowl
india win gold in Lawn Bowl saam tv

नवी दिल्ली : बर्मिंघममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने (India) चौथे सुवर्णपदक जिंकलं आहे. भारताच्या महिला संघाने लॉन बॉल खेळाच्या फायनल इव्हेंटमध्ये दक्षिण अफ्रिकेच्या संघाला १७-१९ ने मात दिली आहे. चौथं सुवर्णपदक जिंकून भारताच्या महिला संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास रचला आहे. दरम्यान, राष्ट्रकुल स्पर्धेत लॉन बॉल खेळात भारताने पहिल्यांदा पदक (Medal) जिंकलं आहे. दरम्यान, राष्ट्रकुल स्पर्धेत मीराबाई चानू,जेरेमी लालरिनुंगा आणि अंचिता शेउली यांनी आतापर्यंत सुवर्णपदक जिंकलं आहे. ( India win gold in Lawn Bowl )

भारताच्या महिला संघाने या इव्हेंटमध्ये मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने खेळात पुनारागमन करत १०-८ ने आघाडी घेतली होती. मात्र, भारतीय संघाने तीनही सेटमध्ये संयम राखत शेवटी १७-१० ने सामना जिंकला. भारतीय महिला संघाच्या विजयानंतर भारतीयांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

india win gold in Lawn Bowl
Asia Cup 2022 Schedule: भारत-पाकिस्तानमध्ये रंगणार सामना, आशिया कपचे वेळापत्रक जाहीर

दरम्यान,भारतीय महिला लॉन बॉल संघाच्या नेतृत्व करणाऱ्या ३८ वर्षीय लवली चौबे या झारखंडच्या पोलीस दलात हवालदार आहेत. तसेच रुपा रानी तिर्कि या रांचीच्या आहेत. त्या झारखंडच्या क्रीडा विभागात काम करतात. यांच्या व्यतिरिक्त आरके पुरममध्ये क्रीडा शिक्षक राहिलेल्या पिंकी या देखील भारतीय संघाच्या सदस्या आहेत. नयनमोनी सैकिया आसामच्या एका शेतकरी कुटुंबातील आहेत. तसेच त्या आसाम राज्यातील वन विभागात काम करतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com