
सुलेमनिया (इराक) : येथे सुरु असलेल्या आशिया कप (स्टेच २) तिरंदाजी स्पर्धेत (archery asia cup stage II) आज (बुधवार) भारतीय तिरंदाजांनी (indian archers) पुन्हा एकदा दमदार कामगिरी करीत तीन सुवर्ण (gold medal), दाेन राैप्य (silver medal) तसेच एक कास्यपदक (bronze medal) पटकाविले आहे. या स्पर्धेत आज भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणा-या साता-याच्या (satara) पार्थ साळूंखेने उत्तम कामगिरी केली. (asia cup stage 2 archery latest news)
रिकर्व्ह प्रकारात तिहेरीत मृणाल चौहान (Mrinal Chauhan) पार्थ साळुंखे (Parth Salunkhe) आणि जुएल सरकार (Juyel Sarkar) यांनी बांगलादेशचा (Bangladesh) (५-१) असा दणदणीत पराभव करीत सुवर्णपदक पटकाविले.
रिकर्व्ह प्रकारात तिहेरीत महिला गटात अवनी (Avani), भजन कौर (Bhajan Kaur) आणि लक्ष्मी हेमब्रोम (Laxmi Hembrom) यांनी बांगलादेशचा (Bangladesh) (५-४) असा पराभव करीत सुवर्णपदक पटकाविले.
मिश्र दुहेरी रिकर्व्ह प्रकारात पार्थ साळुंखे आणि भजन कौर यांना उझबेकिस्तानकडून (५-४) असा पराभव स्विकारावा लागला. यामुळे या दाेन्ही भारतीय खेळाडूंना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
दरम्यान भारतीय संघात समावेश असलेल्या साता-याच्या पार्थ साळुंखेने उझबेकिस्तानच्या अमीरखान सादिकोव्हचा (Amirkhan Sadikov) (६-४) असा पराभव करून कास्यपदक जिंकले.
दरम्यान भजन कौरचा ईराणच्या महता अब्दोल्लाने २-६ असा पराभव केल्याने तिला रौप्य पदकावर समाधाना मानावे लागले. मृणाल चौहानने रुमन शानाचा (६-२) असा पराभव करीत सुवर्ण कामगिरी केली.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.