
मुंबई : आयपीएलच्या १५ व्या पर्वाचा (IPL) समारोप नुकताच झाला. यंदाच्या मोसमात अनेक नवोदीत खेळाडूंची वेगवेगळ्या संघांमध्ये निवड झाली होती. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरलाही (Arjun Tendulkar) मुंबई इंडियन्सच्या संघात ३० लाख रुपयांत खरेदी केले होते. अर्जुन यंदाच्या आयपीएल हंगामात पदार्पण करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, यावर्षीही पदार्पणाच्या आशा-अपेक्षांवर पाणी फेरलं. या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी अर्जुन तेंडुलकरबाबत मोठं विधान केलं आहे.
काय म्हणाले कपिल देव ?
अर्जुन तेंडुलकरवर दबाव टाकू नका. तेंडुलकर सरनेम असल्याने अर्जुनवर थोडा जास्त दबाव असेल. पण अर्जुनला स्वत:चाच खेळ खेळावा लागेल. सचिनचा मुलगा असल्याने सर्वच अर्जुनची चर्चा करत आहेत. परंतु, अर्जुनला त्याचं क्रिकेट खेळूद्या, त्याची तुलना सचिनशी करु नका. अर्जुनबाबत बोलताना कपिल देव पुढे म्हणाले, तेंडुलकर सरनेम असणं अर्जुनसाठी फायद्याचं आणि तोट्याचंही आहे. डॉन ब्रॅडमॅन यांच्या मुलानेही त्याचं नाव बदललं होतं. कारण त्याच्यावर प्रचंड दबाव होता.अर्जुनवर जास्त दबाव टाकू नका,तो खूप तरुण आहे.
तसंच कपिव देव यांनी अर्जुनला सल्ला देताना म्हटलं की, अर्जुनने त्याचा खेळ एन्जॉय केला पाहिजे. त्याला कुणाशी तुलना करुन काहीही साध्य करण्याची गरज नाही. अर्जुन जर त्याच्या वडीलांच्या ५० टक्के जरी बनला, तरी ते खूप मोठं यश असेल, कारण त्याच्या नावासोबत तेंडुलकर सरनेम जोडलं गेलं आहे.
त्यामुळे अर्जुनकडून खूप अपेक्षा आहेत. दरम्यान, मुंबई इंडियन्सने यंदाच्या मोसमात अनेक नवख्या खेळाडूंना संधी दिली होती.अर्जुन तेंडुलकर गेल्या दोन सीजनपासून मुंबई इंडियन्ससोबत असून तो डेब्यूच्या प्रतीक्षेत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.