Team India Selectors: 'या' चार धुरंधरांची भारतीय निवड समितीवर वर्णी, एकाने तर सचिनसोबत केले होते पदार्पण

चार नवे सदस्य सामिल करण्यात आले असून चेतन शर्मा यांचा या निवड समितीत पुन्हा एकदा समावेश करण्यात आला आहे. तसेच या निवड समितीचे अध्यक्षपदही चेतन शर्मा यांच्याकडे देण्यात आले आहे.
team india selectors
team india selectorsSaam tv

Team India Selectors: गेल्यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकातील लाजिरवाण्या पराभव स्विकारावा लागला होता. या पराभवानंतर बीसीसीआयने चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती बरखास्त केली होती. न्नास दिवसांच्या प्रतिक्षेनंतर भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian Cricket Team) नव्या निवड समितीची घोषणा करण्यात आली आहे.

महत्वाचे म्हणजे यामध्ये चार नवे सदस्य सामिल करण्यात आले असून चेतन शर्मा यांचा या निवड समितीत पुन्हा एकदा समावेश करण्यात आला आहे. तसेच या निवड समितीचे अध्यक्षपदही चेतन शर्मा यांच्याकडे देण्यात आले आहे. पाहूया निवड समितीतील नव्या चेहऱ्यांबद्दलची ही माहिती.

team india selectors
BCCI: अखेर BCCI ने केली नव्या निवड समितीची घोषणा, चार नवे चेहरे पण चेतन शर्मांच्या हातीचं पुन्हा सुत्रे

चेतन शर्मा: वेगवान गोलंदाज चेतन शर्माने भारतासाठी 23 कसोटी आणि 65 एकदिवसीय सामने खेळले असून तो या पाच सदस्यीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. चेतन शर्माने कसोटीत ६१, तर वनडेत ६७ विकेट्स घेतल्या आहेत. 1987 च्या विश्वचषकात चेतन शर्माने न्यूझीलंडविरुद्ध अविस्मरणीय हॅटट्रिक घेतली होती.

2. शिव सुंदर दास: भारताचे माजी सलामीवीर शिव सुंदर दासने २३ कसोटी आणि चार एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये शिवसुंदर दास यांनी ३४.८९ च्या सरासरीने १३२६ धावा केल्या ज्यात दोन शतके आणि नऊ अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र, शिवसुंदर यांना वनडेत १३ च्या सरासरीने केवळ ३९ धावा करता आल्या. शिव सुंदर दास हे भारतीय महिला संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आहेत.

3. सुब्रतो बॅनर्जी: पाटणा येथे जन्मलेल्या सुब्रतो बॅनर्जी यांनी 1991 साली भारतीय संघात स्थान मिळवले आणि पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्यांना कसोटी पदार्पण करता आले. सुब्रतो यांनी भारतासाठी एक कसोटी आणि सहा एकदिवसीय सामने खेळले. मध्यमगती गोलंदाज सुब्रतो बॅनर्जीने या काळात कसोटीत तीन आणि एकदिवसीय सामन्यात पाच बळी घेतले.

team india selectors
Maharashtra Politics : नारायण राणेंच्या मंत्रिपदाबाबत खासदारांची भविष्यवाणी; म्हणाले, त्यांच्यासारख्या गद्दार...

4. सलील अंकोला: सचिन तेंडुलकर आणि सलील अंकोला यांनी 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सचिन 200 कसोटी सामने खेळला, पण सलील अंकोला फक्त एकच कसोटी आणि 20 एकदिवसीय सामने खेळू शकले. वेगवान गोलंदाज सलीलने कसोटीत दोन आणि एकदिवसीय सामन्यात १३ बळी घेतले. मुंबई संघाचा निवडकर्ता असलेल्या सलीलने 59 प्रथम श्रेणी सामन्यात 135 बळी घेतले आणि 49 लिस्ट ए सामन्यात 54 बळी घेतले.

5. श्रीधरन शरथ: श्रीधरन शरथ यांनी भारतासाठी एकही सामना खेळला नाही. शरथने तामिळनाडूसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या होत्या. शरथ यांनी 139 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 51.17 च्या सरासरीने 8700 धावा केल्या ज्यात 27 शतके आणि 42 अर्धशतकांचा समावेश आहे. आणि लिस्ट-ए मध्ये शरथने 44.28 च्या सरासरीने 3366 धावा केल्या आहेत. लिस्ट-ए मध्ये शरथने चार शतके आणि 20 अर्धशतके झळकावली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com