
नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकाआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-२० मालिका होणार आहे. भारताच्या धरतीवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला टी-२० सामना २० सप्टेंबरला मोहालीत खेळवला जाणार आहे. या मालिकेत तीन सामने होणार असून कांगारूंचा पराभव करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. दरम्यान, या सामन्यात टीम इंडियाची प्लेईंग ११ काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण मोहम्मद शामी आणि रविंद्र जडेजाचा या मालिकेसाठी प्लेईंग ११ मध्ये समावेश झाला नाहीय. (Indian cricket team Prediction Playing eleven against Australia t20 series )
शामीला कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळं तो मालिकेतून बाहेर झाला आहे. अशातच आता मोहालीत होणाऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाची प्लेईंग ११ काय असणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. टी-२० विश्वचषकाआधी टीम इंडियाला भक्कम करण्यासाठी खेळाडूंना ऑस्ट्रेलियाच्या विरोधात होणाऱ्या मालिकेची शेवटची संधी आहे. प्रयोग आणि तयारी करण्याची वेळ निघून गेली आहे, असं रोहित शर्माने आधीच स्पष्ट केलं आहे. आता सर्व प्रकारच्या रणनीती आखण्याची वेळ आली आहे.
मोहम्मद शामीच्या जागेवर उमेश यादवचा प्लेईंग ११ मध्ये समावेश होण्याची शक्यता धुसर झाली आहे. कारण टीम इंडिया चार गोलंदाजांच्या सोबत पुढे जाताना दिसत आहे. याशिवाय अष्टपैलू खेळाडूंचा संघात समावेश असणार आहे.
पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडियाची प्लेईंग ११
1. रोहित शर्मा (कर्णधार)
2. केएल राहुल (उप-कर्णधार)
3. विराट कोहली
4. सूर्यकुमार यादव
5. हार्दिक पंड्या
6. दिनेश कार्तिक
7. रविचंद्रन आश्विन
8. जसप्रीत बुमराह
9. हर्षल पटेल
10. भुवनेश्वर कुमार
11. युझवेंद्र चहल
पहिला टी-२० सामना : २० सप्टेंबर, मोहाली
दुसरा टी-२० सामना : २३ सप्टेंबर, नागपूर
तिसरा टी-२० सामना : २५ सप्टेंबर, हैद्राबाद
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.