Viral Video: भारताच्या पराभवानंतर रोहित शर्माला अश्रू अनावर, द्रविडने समजावलं, व्हिडिओ झाला व्हायरल

टीम इंडियाच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माचे डोळे पाणावले.
Rohit Sharma
Rohit Sharmasaam tv

मुंबई : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्डकपचा भारतीय संघांचा प्रवास आजच्या इंग्लंडच्या पराभवानंतर अखेर संपूष्टात आला. अॅडलेडच्या मैदानात इंग्लंडने भारताचा 10 विकेट्सने पराभव केला. त्यामुळं टीम इंडियाचं (Indian Cricket Team) पंधरा वर्षापासूनचं स्वप्न भंगलं आहे. भारताने 2007 नंतर टी20 वर्ल्डकप जिंकला नाही. टीम इंडियाच्या या मोठ्या पराभवानंतर चाहत्यांसह कर्णधार रोहित शर्मावर दु:खाचा डोंगर कोसळला. (Rohit sharma cries after team india lose against england)

Rohit Sharma
T20 World Cup: भारत वर्ल्डकपमधून बाहेर, सोशल मीडियावर टीम इंडिया ट्रोल, खेळाडूंवर चाहते भडकले

या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये (T20 World Cup) रोहित शर्मानं अपेक्षित कामगिरी केली नाही. या पराभवानंतर रोहित शर्माला स्वत:ला सावरणं कठिण झालं. रोहित पराभवानंतर मैदानाच्या बाहेर जाऊन डगआऊट मध्ये येऊन बसला. त्यावेळी रोहितचे डोळे पाणावले. त्याचदरम्यान राहुल द्रविड रोहितच्या जवळ येऊन बसला. रोहित शर्मा कोणाशीच बोलत नव्हता आणि खूप नाराज स्थितीत होता. त्यावेळी द्रविडनं रोहितला सांभाळण्याचा प्रयत्न केला.

रोहितने इंग्लंडच्या सलामीवीरांना दिलं विजयाचं श्रेय

भारताचा पराभव झाल्यानंतर रोहित शर्माने म्हटलं, मी खूप नाराज आहे. आम्ही खूप मेहनत घेऊन धावसंख्या रचली. नॉकआऊट मध्ये दबाव कशाप्रकारे असू शकतो, हे फक्त या गोष्टींवरून समजतं. शांत राहण्याची गरज आहे. आम्ही सुरुवातीलाच घाबरलो होतो. त्यांच्या सलामीवीरांना श्रेय दिलं पाहिजे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी20 वर्ल्डकपचा सेमीफायनलचा महामुकाबला अॅडलेडच्या मैदानात रंगला. भारतानं इंग्लंडला 169 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर इंग्लंडचे सलामीवीर कर्णधार जॉस बटलर आणि अॅलेक्स हेल्सनं भारतीय गोलंदाजांचा धुव्वा उडवला. या सलामी जोडीनं नाबाद अर्धशतकी खेळी करून भारतावर एकतर्फी विजय मिळवला. जॉस बटलरने 49 चेंडूत 80 तर अॅलेक्स हेल्सने 47 चेंडूत 86 धावा कुटल्या. दोघांच्या दमदार नाबाद खेळीमुळं भारताचा दारुण पराभव झाला. इंग्लंडने 16 षटकात 170 धावांची खेळी साकारून भारताचा पराभव केला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com