India Vs Australia : 'सूर्या' तळपला, कोहलीची 'विराट' खेळी, भारताने टी-२० मालिका जिंकली

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आजचा निर्णायक सामना रंगतदार झाला.
Virat kohli and suryakumar yadav
Virat kohli and suryakumar yadav saam tv

हैद्राबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक सामना आज हैद्राबादमध्ये झाला. या अटीतटीच्या सामन्यात भारताने चार विकेट्स गमावून १८७ धावांचं लक्ष्य पूर्ण करून ऑस्ट्रेलिया विरुद्ध दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी-२० सामन्यांची मालिका भारताने जिंकली. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आक्रमक खेळी करत भारताला १८७ धावांचं आव्हान दिलं होतं. आस्ट्रेलियाचे आक्रमक फलंदाज कॅमरून ग्रीन आणि टीम डेव्हिडने अर्धशतकी खेळी केली. पंरतु, टीम इंडियाचे स्टार फलंदाज विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि के एल राहुल सलामीला आल्यानंतर पॉवर प्ले मध्येच बाद झाले. पण, कोहली आणि यादवच्या १०० धावांच्या भागिदारीमुळं भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अंतिम सामन्यात विजयाच्या दिशेनं वाटचाल केली. सुर्यकुमार यादव ६९ धावांवर बाद झाल्यानंतर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने भारताची पारी सांभाळली. तर विराट कोहलीने धडाकेबाज फलंदाजी करून ६३ धावांचा पाऊस पाडला. मात्र, डॅनियल सॅमच्या गोलंदाजीवर विराट बाद झाल्यानंतर सामना अटीतटीचा झाला. २ चेंडूत ४ धावांची आवश्यकता असताना हार्दिकने चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला. पंड्याने १६ चेंडूत नाबाद २५ धावांची खेळी साकारली.

सलामीसाठी मैदानात उतरलेल्या आस्ट्रेलियाच्या (Australia) कॅमेरून ग्रीनने धडाकेबाज खेळी करत २१ चेंडूत ५२ धावा कुटल्या. मात्र, भुवनेश्वरने ग्रीनला बाद करून ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला ब्रेक लावला. भारताचा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने (Axar Patel) या सामन्यातही भेदक गोलंदाजी करून ऑस्ट्रेलियाच्या फिंच, इग्निस आणि वेडला बाद करून तीन विकेट्स घेतल्या. मात्र, टीम डेव्हीडने ५४ धावांची अर्धशतरी खेळी करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या वाढवली. तसेच डॅनियल सॅमनेही आक्रमक खेळी करत २८ धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने सात विकेट्स गमावत भारताला १८७ धावांचं आव्हान दिलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com