Indian Cricket Team : भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून मोडला पाकिस्तानचा मोठा विक्रम

टी-२० क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वात जास्त विजय संपादन करण्याचा विक्रम टीम इंडियाच्या नावावर झाला आहे.
Rohit Sharma
Rohit Sharmasaam tv

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन टी-२० सामन्यांमध्ये भारताने २-१ अशा फरकाने विजय संपादन करून मालिका खिशात घातली. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा (Australia) पराभव करून आणखी एका मालिकेवर विजय मिळवला. ही मालिका जिंकल्याने भारताने मोठा विक्रम करून पाकिस्तानला पिछाडीवर टाकले आहे. टी-२० क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वात जास्त विजय संपादन करण्याचा विक्रम आता भारताच्या नावावर आहे. (Indian cricket team breaks pakistan team big record)

Rohit Sharma
India Vs Australia : 'सूर्या' तळपला, कोहलीची 'विराट' खेळी, भारताने टी-२० मालिका जिंकली

टीम इंडियाने २०२२ मध्ये एकूण एकूण २१ टी-२० सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. यावर्षी भारताने २९ सामने खेळले आहेत. यामध्ये २१ सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. तर ७ सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. एका सामन्याचा निर्णय झाला नाही. पाकिस्तानने २०२० मध्ये एका वर्षात २० टी-२० सामने जिंकले होते. पाकिस्तानने हा एक विक्रम केला होता. पंरतु, आता भारताने या विक्रमावर शिक्कामोर्तब केलं आहे.

रोहित शर्मा विराट कोहलीच्या पुढे

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये रोहित शर्मा भारताचा दुसरा यशस्वी कर्णधार बनला आहे. त्याच्यापुढे आता फक्त महेंद्र सिंग धोनी आहे. रोहित शर्माने भारतासाठी ४२ सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून नेतृत्व केलं आहे. यामध्ये ३३ सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळाला आहे. तर ९ टी-२० सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. महेंद्र सिंग धोनीच्या नावावर एकूण ४१ टी-२० सामन्यांमध्ये विजय मिळवल्याचा विक्रम आहे.

Rohit Sharma
झुलन गोस्वामीला टीम इंडियाकडून फेअरवेल गिफ्ट, इंग्लंडला २३ वर्षांनंतर त्यांच्याच भूमीत नमवलं

टी-२० मध्ये भारताचे यशस्वी कर्णधार

१) महेंद्र सिंग धोनी : ७२ सामने, ४१ सामन्यांत विजय, २८ पराभव, १ टाई, २ सामन्यांत निर्णय नाही

२) रोहित शर्मा : ४२ सामने,३३ सामन्यांमध्ये विजय, ९ पराभव,

३) विराट कोहली : ५० सामने, ३२ सामन्यांमध्ये विजय, १६ पराभव,२ सामन्यांत निर्णय नाही

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा (भारत)

सचिन तेंडुलकर : ६६४ सामने, ३४३५७ धावा

विराट कोहली : ४७१ सामने, २४०७८ धावा

राहुल द्रविड : ५०४ सामने, २४०६४ धावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com