Hardik Pandya
Hardik Pandya saam tv

हार्दिक पंड्या २०२३ नंतर निवृत्ती घेणार ? भारताच्या माजी प्रशिक्षकाचं मोठं विधान

इंग्लंड क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टॉक्स एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. स्टॉक्सच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर क्रिकेट जगतात चर्चांना उधाण आलं आहे.

मुंबई : इंग्लंड क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टॉक्स एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. स्टॉक्सच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर क्रिकेट जगतात चर्चांना उधाण आलं आहे. इंग्लंड संघाला विश्व चषक जिंकवणारा स्टॉक्स याही पुढे खेळेल,अशी आशा त्याच्या चाहत्यांना होती. स्टॉक्सला तिन्ही फॉरमॅट खेळणं शक्य होत नव्हतं, म्हणून त्याने निर्णय घेतल्याचा तज्ज्ञांचं म्हणणं आहे. स्टॉक्सच्या निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी एका भारतीय क्रिकेटपटूच्या निवृत्तीवर मोठं भाष्य केलं आहे. (hardik pandya news In Marathi )

Hardik Pandya
३०-४० धावा करूनही अनेक वर्षे संघात क्रिकेटर राहिलेत; विराट कोहलीला अंजुम चोप्राचा पाठिंबा

भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी क्रिकेटपटू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांच्या निवृत्तीवर मोठं विधान केलं आहे. त्यांचा दावा आहे की, पंड्या हा २०२३ च्या विश्व चषकानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. शास्त्री म्हणाले, 'हार्दिक त्याचं सर्व लक्ष टी-२- फॉरमॅटवर केंद्रीत करू शकतो. हार्दिकनंतर भारतीय संघातील काही इतर खेळाडू देखील केवळ एकाच फॉरमॅटमध्ये खेळणे पसंत करतील. खेळाडू आतापासूनच फॉरमॅटची निवड करायला सुरुवात करतील. एकच फॉरमॅटची निवड करणे त्यांचा पूर्ण अधिकार आहे. टेस्ट क्रिकेट फॉरमॅटला मोठं स्थान असू शकतं'.

Hardik Pandya
....तर भारत यशाचं 'शिखर' गाठणार, पाकिस्तानचा मोठा विक्रम मोडण्याची भारताला संधी

'हार्दिक पंड्या आता एकदिवस क्रिकेट सामने खेळणे पसंत करेल, कारण आगामी विश्व चषक भारतात होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय क्रिकेट सामन्यांपासून लांब जाऊ शकतो. इतर खेळाडू देखील त्या प्रकारचा निर्णय घेऊ शकतात. आताच बरेच खेळाडू मनाची तयारी करत आहेत. हार्दिक देखील टी२० फॉरमॅटमध्ये खेळू शकतो', असे शास्त्री म्हणाले.

दरम्यान, हार्दिक पंड्या दुखापतीनंतर जोरदार पुनरागमन करत क्रिकेट मैदान गाजवत आहे. पंड्याने आयपीएलमध्ये गुजरात संघाचं नेतृत्व करत चषक जिंकला होता. पंड्याने सर्वच फॉरमॅटमध्ये खेळाचं चांगलं प्रदर्शन केलं आहे. इंग्लंडच्या विरुद्ध एकदिवसीय मालिकेत पंड्या हा 'प्लेयर ऑफ सीरीज' ठरला होता. या मालिकेमध्ये पंड्या ६ गडी बाद केले होते आणि १०० धावा केल्या होत्या. त्यात ७१ धावा या शेवटच्या सामन्यात केले होते. आता हे पाहावे लागेल की, रवी शास्त्री यांनी हार्दिक पंड्यावर केलेली भविष्यवाणी किती खरी ठरणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com