Rishabh Pant Accident: असंवेदनशीलतेचा कळस! भीषण अपघातानंतर पंतच्या मदतीला कोणीच नाही, गाडीतील लाखो रुपये केले लंपास

या भीषण अपघातानंतर प्रथमदर्शींनी दाखवलेल्या असंवेदनशीलतेचा सर्व स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. अपघातात जखमी झालेल्या पंतला मदत करण्याऐवजी त्याचे व्हिडिओ काढत गाडीतील पैसेही लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Rishabh Pant captain For India vs South Africa T-20 series
Rishabh Pant captain For India vs South Africa T-20 seriessaam tv

क्रिकेटपटू रिषभ पंतच्या भीषण अपघातानंतर त्याच्या चाहत्यांसह क्रिडाविश्वातून त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात आहे. आज पहाटे रिषभ पंतच्या गाडीचा भीषण अपघात झाला असून त्याच्यावर डेहराडूनमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या भीषण अपघातानंतर प्रथमदर्शींनी दाखवलेल्या असंवेदनशीलतेचा सर्व स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. अपघातात जखमी झालेल्या पंतला मदत करण्याऐवजी त्याचे व्हिडिओ काढत गाडीतील पैसेही लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Rishabh Pant Car Accident)

Rishabh Pant captain For India vs South Africa T-20 series
Pakistani movie controversy : 'द मौला जट' चित्रपट रिलीज होणार?; पाकिस्तानी चित्रपटाला वाढता विरोध |

याबाबत स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेटपटूचा रिषभ पंतचा पहाटे भीषण अपघात झाला. अपघातसमयी रिषभ पंतच्या गाडीचा चक्काचुर झाला होता,ज्यामुळे त्याला गाडी बाहेर पडणेही मुश्किल झाले होते. यावेळी अपघातानंतर अनेकजण त्याठिकाणी आले. मात्र जखमी पंतला मदतीचा हात देण्याऐवजी त्यांनी बाहेर पडलेले पैसे गोळा करत पोबारा केला तर काही जण फक्त व्हिडिओ बनवत राहिले.

अपघातावेळी रिषभ पंतच्या गाडीमध्ये ४ ते ५ लाख एवढी रक्कम होती, जी लोकांनी गोळा केली आणि त्याला मदत न करता तिथून पैसे घेवून पळ काढल्याची संतापजनक माहितीही समोर आली आहे.

Rishabh Pant captain For India vs South Africa T-20 series
VIDEO : हिराबेन मोदी अनंतात विलिन; PM मोदींनी दिला मुखाग्नी, गांधीनगरमध्ये शोककुल वातावरणात अंत्यसंस्कार

दरम्यान यावेळी सकाळी कामावर चाललेल्या दोन युवकांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखत रिषभ पंतला मदतीचा हात दिला. ज्यावेळी पंतला रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळीही हे दोन युवक उपस्थित होते. या गंभीर अपघातात पंतच्या पाठीला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. (Indian Cricketer)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com