Ind vs NZ ODI Series: वादळी खेळीचे सिक्रेट काय? शुभमन गिलने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला वाटले नव्हते पण....'

शुभमन गिलने द्विशतक ठोकणारा सर्वात युवा खेळाडू होण्याचाही मान मिळवला आहे. सामन्यानंतर शुभमन गिलने त्याच्या या शानदार खेळीचे सिक्रेट शेअर केले आहे.
Shubhman Gill Scored 200 vs New Zealand
Shubhman Gill Scored 200 vs New ZealandSaamtv

Shubhman Gill : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात सलामवीर शुभमन गिलने दमदार द्विशतकी खेळी केली. या खेळीमुळे शुभमन गिलचं या सामन्याचा खरा हिरो ठरला. गिलच्या या वादळी खेळीने न्यूझीलंडच्या खेळाडूंची अक्षरशः धुलाई केली.

या खेळीसोबतच शुभमन गिलने द्विशतक ठोकणारा सर्वात युवा खेळाडू होण्याचाही मान मिळवला आहे. सामन्यानंतर शुभमन गिलने त्याच्या या शानदार खेळीचे सिक्रेट शेअर केले आहे. (Cricket News)

Shubhman Gill Scored 200 vs New Zealand
Jalna News: रूम पार्टनर ठेवण पडलं महागात; पार्टनरने लावला ३ लाख ८२ हजाराचा चुना

शुभमन गिलने ठोकले वादळी द्विशतक:

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच एकदिवसीय सामना शुभमन गीलने गाजवला. गिलने वादळी द्विशतक साजरे करताना न्यूझीलंडच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. शुभमनने १४९ चेंडूत २०८ धावा कुटल्या, ज्यामध्ये १९ चौकारांसह तब्बल ९ षटकारांची आतषबाजी केली.

सामन्यानंतर शुभमन गिलने सांगितले की, "त्याला द्विशतक होईल असे अजिबात वाटले नव्हते. मात्र ४७ व्या षटकात दोन षटकार लगावल्यानंतर असे होऊ शकते याची खात्री पटली." त्याचसोबत शुभमन गिलने ईशांत किशन त्याचा जिवलग मित्र असल्याचेही सांगितले.

Shubhman Gill Scored 200 vs New Zealand
Pune Crime News : मुल होत नसल्याने नवऱ्याने बायकोला भोंदूबाबाकडे नेलं अन्.., पुण्यातील संतापजनक घटना

पुढे बोलताना तो म्हणाला की, "मी तिथून बाहेर पडावे आणि मला जे करायचे आहे ते करण्यासाठी मी वाट पाहत होतो. विकेट पडल्यामुळे मला मोकळी फलंदाजी करायची होती, पण शेवटी अशी फलंदाजी मला करता आली याचा मला आनंद आहे. काहीवेळा जेव्हा गोलंदाज मुख्यस्थानी असतो, तेव्हा त्याच्यावर दडपण टाकणे गरजेचे असते. डॉट बॉल टाळणे, आणि गॅपमध्ये वेगाने फटके मारणे आवश्यक आहे, जे मी करत होतो."

ईशान किशनला मानतो जवळचा मित्र...

शुबमन गिल पुढे म्हणाला, "खरोखर २०० धावांचा विचार करत नव्हतो, पण एकदा मी ४७व्या षटकात षटकार मारला की मी हे करू शकेन असे मला वाटले. पूर्वी जे चेंडू माझ्याकडे येत होते तेच मी खेळत होतो. ईशान किशन (IShan Kishan) चांगला मित्रांपैकी एक आहे. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट नियमितपणे करायची असते तेव्हा छान वाटते. या कामगिरीवर मी पूर्णपणे समाधानी आहे."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com