टीम इंडियाला मोठा झटका! विराट कोहलीला कोरोनाची लागण

मालदीवमधून परतल्यानंतरच विराट कोहलीला कोरोना झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
टीम इंडियाला मोठा झटका! विराट कोहलीला कोरोनाची लागण
Virat Kohli News, Team India News updatesSaam Tv

मुंबई - महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषाणूचा फटका सर्वसामांन्यांपासून, बॉलिवूड कलाकार, मालिका विश्वातील अभिनेते-अभिनेत्री तसेच बड्या नेत्यांना देखील बसला आहे. त्यातच आता विराट कोहलीला (Virat Kohli) कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. मालदीवमधून परतल्यानंतरच विराट कोहलीला कोरोना झाला असल्याची माहिती समोर येत आहे. (Team India News updates)

हे देखील पाहा -

भारतीय क्रिकेट टीमला इंग्लंड दौऱ्यावर एकमेव टेस्ट सामना खेळायचा आहे, मात्र त्याआधी विराट कोहलीला कोरोना झाल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी 1 जुलैपासून सुरू होणार असून ती 5 जुलैपर्यंत खेळवली जाणार आहे. पण, विराट कोहलीच्या कोरोना रिपोर्टने चाहत्यांची चिंता वाढवली आहे.

Virat Kohli News, Team India News updates
असली गुवाहाटीत, नकली 'वर्षा'वर; मनसेनेकडून उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

रविचंद्रन अश्विननंतर आता विराट कोहलीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आता अशा परिस्थितीत आणखी खेळाडूंना कोरोना संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारत आणि इंग्लंड पुढील महिन्यात बर्मिंगहॅम येथे होणार्‍या एकमेव कसोटीत आमनेसामने येणार आहेत. याआधी भारतीय संघ 24 जूनपासून लीसेस्टर काउंटी संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. मात्र, अश्विन, विराटची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने चाहत्यांची चिंता वाढवली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com