Umran Malik : उमरान मलिकच्या वेगवान चेंडूने नवा वाद; हिंदी-इंग्रजी चॅनलच्या कृत्याने क्रिकेट फॅन्स संभ्रमात

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज उमरान मलिक वेगवान गोलंदाजीमुळे चर्चेत आला आहे.
Umran Malik
Umran MalikSaamtv

Umran Malik Fastest Ball : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज उमरान मलिक वेगवान गोलंदाजीमुळे चर्चेत आला आहे. उमरान मलिक अनेक क्रिकेट फॅन्सच्या चर्चेचा विषय ठरला आहे. याचदरम्यान, उमरानने श्रीलंकेविरुद्ध एका सामन्यात 156 km/h च्या वेगाने चेंडू टाकला. मात्र, या वेगवान चेंडूमुळे नवा वाद समोर आला आहे.

Umran Malik
Rishabh Pant Updates : ऋषभ पंत IPL 2023 खेळणार? सौरव गांगुलीने स्पष्टचं सांगितलं

उमरान मलिकने (Umran Malik) श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेच्या एका सामन्यात 155 km/h च्या वेगाने चेंडू टाकला. वेगवान गोलंदाजी करून उमरानने विक्रम केला. त्यानंतर उमरानने श्रीलेकंच्या विरुद्ध एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात 156 km/h वेगाने चेंडू टाकला. या वेगवान चेंडूमुळे नवा वाद सुरू झाला आहे. या चेंडूच्या वेगावरून चाहते संभ्रमात आहे. कारण उमरानने टाकलेला वेगवान चेंडू त्याचा नावाने नोंद होणार का नाही, यावरून चाहते संभ्रमात आहे.

दरम्यान, उमरानने गुवाहाटीमधील एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेच्या (Srilanka) विरुद्ध १४ व्या षटकात चौथा चेंडू हा सर्वाधिक वेगवान टाकला. उमरानने तो वेगवान चेंडू सामन्याच्या त्याच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकात टाकला. मात्र, वेगवान चेंडू टाकल्यानंतर हिंदी कमेन्ट्री करणाऱ्या चॅनलवर चेंडूचा वेग दाखवला नाही. षटक झाल्यावर षटकाच्या सर्व चेंडूचा वेग दाखवला. त्यात एका चेंडूचा वेग 156 KM/h होता

Umran Malik
Prithvi Shaw : पृथ्वी शॉची बॅट तळपली; रणजी ट्रॉफीत रचला इतिहास, तेंडूलकर, गावस्करांनाही टाकलं मागे

दुसरीकडे इंग्रजी कमेन्ट्री करणाऱ्या चॅनलने त्याच षटकाचा चौथा चेंडूचा वेग हा 145.7 km/h दाखवला. यामुळे चाहते संभ्रमात पडले आहे. त्या चेंडूचा खरा वेग काय होता, यावरून चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तर वेगवान चेंडूचा विक्रम उमरानच्या नावावर नोंद होणार का, हा प्रश्न क्रिकेट फॅन्सला पडला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com