इंग्लंड मालिकेपूर्वी मोठा धक्का; भारतीय खेळाडूला कोरोनाची लागण
इंग्लंड मालिकेपूर्वी मोठा धक्का; भारतीय खेळाडूला कोरोनाची लागणSaam Tv

इंग्लंड मालिकेपूर्वी मोठा धक्का; भारतीय खेळाडूला कोरोनाची लागण

या खेळाडूचे नाव गुलदस्त्यात

इंग्लंडमध्ये England कोरोना Coronaव्हायरसचे संक्रमण वाढताना दिसत असून याचा फटका आता इंडिया क्रिकेट टीमला India Cricket Team बसला आहे. इंडिया टीम इंग्लंड दौऱ्यावर गेली आहे. दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेनंतर ब्रेकवर असणाऱ्या भारतीय संघातील एका खेळाडूला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे.  प्राप्त माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये एका खेळाडूची कोरोना टेस्ट Corona Test पॉझिटीव्ह आली आहे.

या खेळाडूचे नाव गुलदस्त्यातच असून त्याला आणि कुटुंबाला आयसोलेशनमध्ये   ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात न्यूझीलंडबरोबर विश्व कसोटी अंजिक्यपद स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडमध्ये सुट्टीवर आहे.

हे देखील पहा -

इंग्लंडमध्ये विविध ठिकाणी फिरण्यासाठी गेल्यानंतर त्या खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचे समजते. या खेळाळूच्या संपर्कात आलेले इतर काही खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांच्या सदस्यांनाही देखील तीन दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. हा खेळाडू संसर्गातून बरा झाल्यानंतर डरहमला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.

४ ऑगस्टपासून इंग्लंडविरोधात भारताची कसोटी मालिका सुरु होणार आहे. त्यापूर्वीच भारतीय संघातील एका खेळाडूला कोरोना या विषाणूची लागण झाली आहे. खेळाडूला कोरोनाची लागण झाल्यामुळे भारतीय संघाच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेला अद्याप २० दिवसांचा कालावधी आहे. 

इंग्लंड मालिकेपूर्वी मोठा धक्का; भारतीय खेळाडूला कोरोनाची लागण
राज्याच्या आरोग्य सल्लागारांकडून सांगली जिल्ह्यात पाहणी

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय संघाला न्यूझीलंड विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये  पराभवाला सामोरे जावे लागले होते.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी हा आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे. त्यामुळे या मालिकेत दमदार कामगिरी करुन आपली दावेदारी भक्कम करण्याच्या इराद्याने टीम इंडिया आता मैदानात उतरणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com