IND VS AUS 2nd ODI: लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाच्या नावे झाली 'या ' नकोशा विक्रमांची नोंद

Ind vs aus records: या निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघाच्या नावे नकोशा विक्रमांची नोंद झाली आहे.
Team India
Team IndiaSaam Tv

Ind vs Aus: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी पार पडला.

या सामन्यात भारतीय संघाला १० गडी राखून दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघाच्या नावे नकोशा विक्रमांची नोंद झाली आहे.

Team India
Ind vs Aus: अखेर रोहितने मौन सोडले! सूर्यकुमार यादवची वनडे संघातून होणार सुट्टी?

या मालिकेतील पहिला वनडे सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्टेलियाचा डाव १८८ धावांवर संपुष्ठात आणला होता. तर दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलिया संघाने जोरदार पुनरागमन करत भारतीय संघाचा डाव ११७ धावांवर संपुष्ठात आणला. (Latest sports updates)

ही ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळताना भारतीय संघाची तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी भारतीय संघाचा डाव ६३ आणि १०० धावांवर संपुष्ठात आला होता.

विशाखापट्टणमच्या मैदानावर खेळताना भारतीय संघाने मायदेशातील चौथी सर्वात कमी धावसंख्या केली आहे. यापूर्वी २०१७ मध्ये भारतीय संघाचा डाव ११२ धावांवर संपुष्ठात आला होता. या यादीत ७८ धावा ही भारतीय संघाची सर्वात कमी धावसंख्या आहे.

Team India
IND vs AUS : गिलचा फ्लॉप शो, सूर्यकुमारचं सरेंडर, भारताचा वनडेत सर्वात मोठा पराभव; नकोसा विक्रम नावावर

हा सामना भारतीय संघाने १० गडी राखून गमावला आहे. या पराभवासह भारतीय संघाच्या नावे आणखी एका नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.

भारतीय संघ वनडे क्रिकेटमध्ये सहाव्यांदा १० गडी राखून पराभूत झाला आहे. ११८१ मध्ये न्यूझीलंड, १९९७ मध्ये वेस्ट इंडिज, २००० आणि २००५ मध्ये दक्षिण आफ्रिका २०२० आणि २०२३ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघाला १० गडी राखून पराभूत केले आहे.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाचा डाव ११७ धावांवर संपुष्ठात आला आहे. भारतीय संघासाठी विराट कोहलीने ३१ धावांची खेळी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com