INDvsENG 2nd Test: लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय; इंग्लंडला नवमवत विजयी पतका

केवळ ३ मध्ये भारतीय संघाने जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे. कपिल देव, महेंद्रसिंग धोनी आणि आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा ऐतिहासिक ठिकाणी विजयी कामगिरी केली आहे.
INDvsENG 2nd Test: लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय; इंग्लंडला नवमवत विजयी पतका
INDvsENG 2nd Test: लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय; इंग्लंडला नवमवत विजयी पतका Saam Tv

INDvsENG 2nd Test : भारतीय Indian संघाने लॉर्ड्सवर १९ कसोटी सामने खेळले आहे. मात्र, केवळ ३ मध्ये भारतीय संघाने जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे. कपिल देव, महेंद्रसिंग धोनी आणि आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा ऐतिहासिक ठिकाणी विजयी कामगिरी केली आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वातवाने भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर होता. लॉर्ड्स या ठिकाणी झालेल्या पहिल्या कसोटी मध्ये भारतीय संघाने दिमाखात विजय मिळविला आहे.

इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करत असताना, २९४ धावांची मजल मारलेली आहे. ग्रॅहम गूचने ११४ धावांची खेळी यावेळी साकारली आहे. डेरेक प्रिंगलने ६३ धावा करत त्याला उत्तमप्रकारची साथ दिली आहे. भारताकडून चेतन शर्मा यांनी ५ विकेट्स घेतले आहे. दिलीप वेंगसरकर यांच्या शतकाच्या जोरावर भारताने ३४१ धावा करत लहान पण महत्त्वपूर्ण आघाडी ठरवलेली आहे. वेंगसरकर यांनी १२६ धावांची दिमाखदार खेळ रंगवला होता.

मोहिंदर अमरनाथ यांनी ६९ धावा करत, त्याला उत्तमप्रकारे साथ दिली आहे. इंग्लंडतर्फे ग्रॅहम डिलीने ४ तर डेरेक प्रिंगलने ३ विकेट्स घेतले आहे. भारतीय संघाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडने दुसऱ्या डावात गुडघे टेकवले आहे. त्यांचा २ डाव हा १८० धावातच आटोपलेला आहे. कपिल देवने ४ तर मणिंदर सिंगने ३ विकेट्स यावेळी घेतले आहे. भारतीय संघाला विजयाकरिता १३४ धावांचे लक्ष्य मिळवले आहे.

हे देखील पहा-

वेंगसरकर यांनी ३३ धावा करत विजयाचा पाया रचवला आहे. कपिल देव आणि रवी शास्त्री यांनी भारताच्या विजयावर यावेळी शिक्कामोर्तब केले आहे. कपिल देव यांना २४ धावा आणि ५ विकेट्स करता सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. क्रिकेटची पंढरी समजली जाणारी लॉर्डस मैदानावर भारतीय संघाचा हा पहिलाच विजय होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०१४ मध्ये लॉर्ड्सवर संस्मरणीय विजय साकारलेला होता.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून, प्रथम गोलंदाजीचा निर्णय यावेळी घेतलेला होता. गोलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टीवर तंत्रकौशल्याचा वस्तुपाठ सादर करत अजिंक्य रहाणेने सुरेख शतक यावेळी साकारले होते. अजिंक्यने १५ चौकार आणि १ षटकारासह १०३ धावांची खेळी साकारली होती. भारतीय संघाने २९५ धावा केले होते. इंग्लंडने गॅरी बॅलन्सच्या शतकाच्या जोरावर ३१९ धावा करत अल्पशी आघाडी घेतलेली होती.

बॅलन्सने ११० धावांची खेळी त्यावेळी करण्यात आली आहे. लायम प्लंकेटने ५५ धावा करत त्याला चांगलीच जुगलबंदी दिली होती. स्विंग बॉलिंगचा नमुना सादर करताना भुवनेश्वर कुमारने ६ विकेट्स घेतले होते. भारताने दुसऱ्या डावामध्ये ३४२ धावा करत विजयाची पायाभरणी केलेली होती. मुरली विजयचे शतक अवघ्या ५ धावांनी हुकले आहे. रवींद्र जडेजाने ६८ तर भुवनेश्वरने ५२ धावांची खेळी करण्यात आली आहे.

INDvsENG 2nd Test: लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय; इंग्लंडला नवमवत विजयी पतका
ICC Test Rankings: बुमराहची उडी तर कोहलीची घसरण; वाचा सर्व यादी

भारतीय संघाने इंग्लंडसमोर ३१९ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले आहे. इशांत शर्माच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडने पूर्णपणे शरणागती पत्करलेली होती. इशांतने ७ विकेट्स घेत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले आहे. इशांतलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. लोकेश राहुलच्या शानदार शतकाच्या बळावर भारतीय संघाने ३६४ धावांचा पल्ला गाठलेला आहे. रोहित शर्माने ८३ धावा केले आहे.

राहुलने १२ चौकार आणि एका षटकारासह १२९ धावांची खेळी यावेळी केली आहे. जेम्स अँडरसनने ५ विकेट्स घेतले आहे. कर्णधार जो रूटच्या १८० धावांच्या खेळीच्या बळावर इंग्लंडने ३९१ धावांची मजल मारत मोठी आघाडी पटकावली आहे. रूटने १८ चौकारांच्या साथीने ही खेळी सजवलेली होती. भारतातर्फे मोहम्मद सिराजने ४ तर इशांत शर्माने ३ विकेट्स घेतले आहे. दुसऱ्या डावामध्ये भारताची अवस्था ५५/३ अशी होती.

मात्र, यानंतर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या अनुभवी जोडीने ४ विकेटकरिता १०० धावांची भागीदारी यावेळी करण्यात आली आहे. मात्र ४ दिवसाअखेर हे दोघेही बाद झाल्यामुळे टीम इंडियाच्या अडचणीमध्ये वाढ करण्यात आली आहे. रहाणेने ६१ तर पुजाराने ४५ धावांची खेळी केलेली आहे. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहने ८९ धावांची भागीदारी करण्यात आली आहे. या भागीदारीमुळे भारतीय संघाने इंग्लंडसमोर २७२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारतीय संघाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडने शरणागती यावेळी पत्करली आहे. त्यांचा डाव १२० धावातच आटोपले आहे. मोहम्मद सिराजने ४ तर जसप्रीत बुमराहने ३ विकेट्स घेतले आहे. राहुलला सामनावीर पुरस्काराने यावेळी गौरवण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com