ICC T20 World Cup Prize Money : पैसाच पैसा! टी-२० वर्ल्डकप संघांना करणार मालामाल

१६ ऑक्टोबरला विश्वचषकाची सुरुवात होणार असून यामध्ये सहभागी होणाऱ्या संघांवर पैशांचा पाऊस पडणार आहे.
ICC T20 World Cup Prize Money
ICC T20 World Cup Prize Moneysaam tv

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक २०२२ साठी आयसीसीने प्राईज मनीची घोषणा केली आहे. विश्वचषक जिंकणाऱ्या आणि हारणाऱ्या संघाला कोट्यावधी रुपयांचं बक्षिस मिळणं निश्चित आहे. तसच या विश्वचषकात जे संघ सहभागी होणार आहेत, त्यांनाही काही ना काही बक्षिसं दिली जाणार आहेत.

ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबरला विश्वचषकाची (world cup) सुरुवात होणार असून यामध्ये सहभागी होणाऱ्या संघांवर पैशांचा पाऊस पडणार आहे. आयसीसीने शुक्रवारी याबाबत प्राईज मनीची घोषणा केली. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये विजेत्या संघाला जवळपास १३ कोटी रूपयांचं बक्षिस मिळणार आहे. (ICC announced t-20 world cup 2022 prize money for winning team)

आयसीसीने दिलेली माहिती अशी की, विजेत्या संघाला तब्बल १.६ मिलियन डॉलर एवढी रक्कम दिली जाईल. तर अंतिम सामन्यात पराभव झालेल्या संघाला या रक्कमेच्या ५० टक्के बक्षिस दिलं जाणार आहे. टी-२० विश्वचषकात एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. या संघांना आयसीसीकडून काही ना काही बक्षिसे दिली जाणार आहेत.

कोणत्या संघाला कसे मिळणार पैसै?

टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला 1.6 मिलियन डॉलर, रनर-अप टीमला ८ लाख मिलियन डॉलर मिळणार आहेत. तर सेमीफायनल मध्ये जाणाऱ्या दोन संघांना 4-4 लाख मिलियन डॉलर दिले जाणार आहेत. टी-२० विश्वचषकासाठी एकूण 5.6 मिलियन डॉलर एवढी प्राईज मनी घोषीत केली आहे. या रक्कमेचं 16 संघांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वाटप केलं जाईल.

ICC T20 World Cup Prize Money
T20 World Cup : जसप्रीत बुमराह विश्वचषकातून बाहेर, टीम इंडियाच्या 'या' गोलंदाजांना मिळू शकते संधी

सुपर-12 स्टेजमध्ये एकूण 12 संघ खेळणार आहेत. यामधील 4 संघ सेमीफायनल स्टेजमध्ये जातील. जे 8 संघ या स्टेजमधून बाहेर जाणार आहेत, त्यांनाही आयसीसीकडून बक्षिसं दिली जाणार आहेत. या संघांना 70 हजार डॉलर दिले जाणार आहेत. मागच्या विश्वचषकात ही रक्कम 40 हजार डॉलर इतकी होती.

जे चार संघ पहिल्या फेरीतूनच बाहेर जातील त्यांना 40 हजार डॉलर दिले जातील. तर पहिल्या फेरितील विजयावरही ४० हजार डॉलरचं बक्षिस दिलं जाणार आहे. या फेरीत एकूण १२ सामने खेळवले जाणार आहेत. याचदरम्यान, आयसीसीकडून एकूण 4.8 लाख डॉलरचं वाटप करण्यात येईल. आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या सुपर-12 स्टेजमधून 8 संघांची जागा निश्चित आहे.

ICC T20 World Cup Prize Money
T20 World Cup Squad Change : टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाच बदलणार? काय असू शकतं कारण?

यामध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. उर्वरीत 8 संघांना पहिला राऊंड खेळावा लागेल. ज्यामध्ये नामिबीया, श्रीलंका, नेदरलॅंड, युएई, वेस्टइंडिज, स्कॉटलॅंड, आयरलॅंड आणि झिम्बाब्वे संघाचा समावेश आहे. या 8 संघांमधून 4 संघस सुपर-12 साठी क्विलिफाय केले जातील.

टी-२० विश्वचषकात कुणाला मिळणार किती रक्कम?

विजेता संघ : जवळपास 13 कोटी रूपये

रनर अप : 6.52 कोटी रूपये

सेमीफायनल : 3.26 कोटी रूपये

सुपर-12 मध्ये विजय : 32 लाख रूपये

सुपर-12 मधून बाहेर पडणारा संघ : 57 लाख रूपये

पहिल्या राऊंडमध्ये विजय : 32 लाख रूपये

पहिल्या राऊंडमध्ये बाहेर झाल्यावर : 32 लाख रूपये

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com